कोरोना संसर्ग रोखण्यासाठी डाॅक्टर्स व कर्मचाऱ्यांना कपडे,मास्क व इतर उपकरणे उपलब्ध करा
नवी दिल्ली : डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित कपडे, उपकरणे द्या, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून म्हणणे मागवले.देशभर रुग्णालयांत काम करणारे डॉक्टर्स तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा म्हणून जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) मान्यता असलेले कपडे, मास्क व इतर उपकरणे उपलब्ध करून देण्यासंबंधी दाखल जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचे म्हणणे मागवले आहे.
नागपूरचे डॉ. जेरीत बर्नेट यांनी दाखल केलेल्या या जनहित याचिकेवर न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने व्हीसीच्या माध्यमातून सुनावणी केली. याचिकाकर्त्याच्या वतीने वकील सुनील फर्नांडिस म्हणाले, की कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरातील डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत आहेत. त्यांना याचा संसर्ग होण्याचा सर्वात मोठा धोका आहे.
Thursday 2 April 2020
Home
राष्ट्रीय
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी डाॅक्टर्स व कर्मचाऱ्यांना कपडे,मास्क व इतर उपकरणे उपलब्ध करा
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी डाॅक्टर्स व कर्मचाऱ्यांना कपडे,मास्क व इतर उपकरणे उपलब्ध करा
Tags
# राष्ट्रीय
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
राष्ट्रीय
Labels:
राष्ट्रीय
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment