तालुका प्रशासनाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ७० रक्तदात्याने केले रक्तदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 4 April 2020

तालुका प्रशासनाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ७० रक्तदात्याने केले रक्तदान

तालुका प्रशासनाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ७० रक्तदात्याने केले रक्तदान


 किनवट : तालुका प्रशासनाच्या वतीने  साने गुरुजी रुग्णालयात काल(दि.३) झालेल्या रक्तदान शिबिरात विविध क्षेत्रातील ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले खा.हेमंत पाटील यांनी शिबिर  स्थळी भेट देऊन रक्तदात्यांचे अभिनंदन केले.
   रक्त दात्यांचा उत्साह पाहून सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल,तहसीलदार नरेंद्र देशमुख व अनेकांनी रक्तदान करण्यासाठी  प्रतीक्षा यादीत आपले नाव नोंदविले आहे.


          कोविड १९ च्या उपद्रव झाल्यामुळे लॉकडाऊन  नंतर रक्तदान शिबिरे न झाल्यामुळे राज्यात रक्तपेढी मध्ये रक्ताचा साठा कमी होत असल्याचे व त्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन  आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी केल्या नंतर अनेक संघटना ,संस्था व रक्तदाते रक्तदान शिबिर घेण्यासाठी पुढे आले. किनवट प्रशासनाकडे रक्तदान शिबिराची परवानगी मागू लागले.  कोरोना साथी च्या वेळी अनेक शिबिरे होण्या पेक्षा सुरक्षित पणे एकच  रक्तदान व्हावे म्हणुन संयुक्त शिबीर आयोजित करून रक्तदानाचे आवाहन करण्यात आले होते. त्यास उस्फुर्त  प्रतिसाद देत ७०  रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रारंभी सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल,तहसीलदार नरेंद्र देशमुख तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या वतीने  रक्तदात्यांना  शुभेच्छा देन्यात आल्या. पोलिस,रक्तदाते व कर्तव्य बजावणारे कर्मचारी  यांच्या साठी घरी मास्क शिवून मोफत वाटप करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका व रक्तदात्या श्यामल पांडगळे-बेद्रे ,दिव्यांग संघटनेच्या रक्तदात्या यमुना केंद्रे ,रक्तदाते प्रशासनाचे प्रतिनिधी  तलाठी वसमतकर, वकील संघटनेचे सचिव ऍड. डी. जी. काळे व बाळकृष्ण कदम यांनी शुभेच्छा दिल्यानंतर  रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला.
    समारोपात खा. हेमंत पाटील यांच्या हस्ते पहिल्यांदा रक्तदान करणारी  समीक्षा श्रीकांत कांचरलावार,मुलीच्या पहिल्या  वाढ दिवसाच्या निमित्ताने रक्तदान करणारे स्वामी मूर्ती कोलगुटवार, सुरज सातूरवार,प्रशांत कोरडे,  शिवा सुरेश सोळंके,विशाल विलास राठोड  यांचा प्रमाणपत्र देऊन प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. शिबिर स्थळी रक्तदात्यांचा उत्साह वाढविण्या साठी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, नगरसेवक अभय महाजन माजी नगराध्यक्ष दिनकरराव चाडावार, के. मूर्ती,प्रा किशनराव किनवटकर, अभियंता प्रशांत ठमके , ज्योतिबा खराटे, बालाजी मुरकुटे,  राजाराम गटलेवार, प्रदीप वाकोडीकर,फेरोज हिराणी, उदय गंधेवार,श्रीनिवास सातूरवार,उत्तम कानींदे ,साजिद बडगुजर ,प्राचार्य राहुल तौर यांच्या सह रक्तदाते उपस्थित होते.
   डॉ.अशोक बेलखोडे, रेडक्रॉस रक्तपेढीचे डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. अभिजीत चिंचपूरकर, सहायक संदीप राजभोज यांच्या मार्गदर्शनात रक्तदान झाले. शिबिर समन्वयक नायब तहसीलदार महंमद रफिक म. बशीर,प्रा. डॉ. सुनील व्यवहारे, प्रा. डॉ. पंजाब शेरे,गणेश बिंगेवार, विकास बोलेनवार यांनी शिबीर आयोजना साठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages