मुखेड येथील कोरोना रुग्णालयास जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांची भेट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 4 April 2020

मुखेड येथील कोरोना रुग्णालयास जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांची भेट

मुखेड येथील कोरोना रुग्णालयास जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांची भेट





  नांदेड  : जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी मुखेड व नांदेड रुग्णालय येथे 50 बेड चे विशेष कोरोना रुग्णालय सुरु केले असुन यात मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यासह  देगलुर, नायगाव , कंधार,बिलोली येथील कोरोना रुग्णास आणण्यात येणार आहे. येथील सुविधा सोई - सुविधा पाहण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर यांनी उपजिल्हा रुग्णालय भेट दिली.
      या भेटीत आ.डॉ. तुषार राठोड यांच्यासह
उपविभागीय अधिकारी शक्ती कदम,तहसिलदार काशिनाथ पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर,कोरोना विभागाचे नोडल ऑफिसर डॉ नागेश लखमावर ,वैद्यकिय अधिक्षक डॉ. आनंद पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले, तलाठी बि.आर. बोरसुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          या भेटीदरम्यान उपजिल्हा रुग्णालयाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून कोरोनाच्या रुग्णासाठी लागेल ते साहित्य खरेदी करावे यासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही सांगितले . येथील सुविधेबाबत समाधान व्यक्त केले. तर आ.डॉ.तुषार राठोड यांनी रुग्णालयाच्या साहित्य खरेदी साठी 25 लक्ष रुपये निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला.
     जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर यांनी शहरातील खाजगी दवाखाने डॉक्टरांनी चालु करावीत अन्यथा त्यांच्या योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे यावेळी निर्देश दिले आहेत. खाजगी दवाखाने बंद असल्याने अनेक रुग्णाचे हाल होत आहेत. ग्रामीण भागात कसल्याच सुविधा नसल्याने नागरीक शहरात येत आहेत पण शहरातील दवाखाने बंद असल्याने नागरीक हैराण झाले आहेत.यामुळे
  जिल्हाधिकारी यांनी दवाखाने चालु करण्यात यावे असे निर्देश दिले, यावेळी जिल्हाधिकारी डॉ. वीपीन इटनकर यांच्या हस्ते गोर गरीब, हातावरचे पोट असणाऱ्यास धान्यही वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages