जिल्हाबाहेर अडकलेल्या जिल्ह्यातील कामगार, मजुरांना आर्थिक मदत
ना. संजय राठोड यांचा पुढाकार
भोजनासह साबण,सॅनिटायझरचे वितरण
यवतमाळ : कोरोना विषाणूंच्या संसर्गामूळे सर्व देश ठप्प झाल्याने परजिल्हासह परप्रांतात जिल्हातील असंख्य कामगार, मजूर अडकून पडले. त्यांच्या समस्या “हेल्पलाईन” वर जाणून घेत अडचणीतील शेकडो कामगारांना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मदतीचा हात देवुन दिलासा देत आहे.
जिल्ह्यातील असंख्य कामगार कामासाठी, नोकरी, व्यवसायासाठी गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगाणा, आंध्रपदेश, राजस्थानासह दिल्ली, मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये गेले आहेत. देशात टाळेबंदीची घोषणा झाल्यानंतर बहुतांश कामगार आपल्या परिवारासह गावाकडे यायला निघाले. मात्र प्रवासाचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने ते विविध ठिकाणी अडकून पडले. ना. संजय राठोड यांच्या पुढाकारात अशा कामगार यांचेकरीता यवतमाळ जिल्हातुन “हेल्पलाईन” सुरु करण्यात आली. हेल्पलाईनचे क्रमांक समाजमाध्यमांवरुन संबंधित कामगारांपर्यत पोहचविण्यात आले. या हेल्पलाईन क्रमांकावर दररोज मदतीसाठी अनेकांचे फोन येत आहेत. पालकमंत्री यांचे मार्गदर्शनात एक स्वतंत्र यंत्रणा या क्रमांकावर फोन आलेल्या कामगारांची अडचण समजून घेत खातरजमा करुन मदत पोहाचवीत आहेत. दवाखाना, औषध, भोजनासाठी पैसे नसल्याने अनेकांनी मदत मागितली. पालकमंत्री संजय राठोड यांनी पुढाकार घेवुन विविध प्रायोजक यांचेसोबत संपर्क साधुन दररोज 100 ते 200 कामगार आणि मजुर यांच्या बँक खात्यात तातडीची मदत जमा करण्यात येत आहे. अशा पद्धतीने सक्षम नागरिक आणि स्वयंसंस्थांनी देखील अडचणीत सापडलेल्या कामगारांना मदत करण्याचे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
टाळेबंदीमुळे काम नसल्याने कामगार, मजुरांच्या चुलीही दररोज पेटेनाशा झाल्या आहेत. अशा गरजवंतांना शिजवलेल्या अन्नासह अन्नधान्य, किराणा या वस्तुंचा पुरवठाही मतदार संघातील गरजूंना ना. संजय राठोड यांच्या वतीने केला जात आहे. ज्यांच्या दोन वेळच्या जेवणाची समस्या आहे, त्यांच्या मागणीनुसार ना. संजय राठोड यांचे कार्यकर्ते अन्न शिजवून त्यांच्यापर्यत पोहोचवून देत आहेत. गावोगावी पाल ठोकून राहणाऱ्या भटक्या लोकांची दोन वेळच्या जेवणाची सोय यामुळे झाली. शिवाय स्वस्त धान्य दुकानातूही अडचणीतही सर्व नागरिकांना धान्य पुरवठा करण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे अतयंत गरजेचे आहे. त्या अनुषंगाने मतदार संघातील सर्व नागरिकांना अत्यंत माफक अशा 20 आणि 10 रुपये दराने सॅनिटायझर पुरविण्यात येत आहेत. शिवाय लाईफबॉयचे दोन साबणही मोफत देण्यात येत आहे व त्याचे वितरणही शुक्रवार पासुन मतदार संघात सुरु झाले. सॅनिटायझरपेक्षा किटाणूंचा खात्मा करण्यासाठी साबण अधिक प्रभावी असल्याचे एक संशोधन नुकतेच वाचण्यात आले. त्यामूळे मतदार संघात साबण वाटप कार्यक्रम सुरु केला. जी साबण वाटण्यात येत आहे, ती किटाणू मारण्यासाठी सर्वात प्रभावी असल्याचे दिसून आल्याने हा निर्णय घेतला. प्रत्येकाने दिवसातून तीन-चार वेळा साबणाने हात स्वच्छ धुतल्यास कोरोनापासून बचाव होण्याची शक्यता अधिक आहे. येणाऱ्या काळात सर्व नागरिकांना या साबण वाटपाचा विचार आहे. नागरिकांनी शासन, प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा, विनाकारण घराबाहेर पडू नये, भाजी, किराणा, दुकानांत गर्दी करु नये, असे आवाहनही ना. संजय राठोड यांनी जनतेला केले आहे.
***
Saturday 4 April 2020
Home
प्रादेशिक
जिल्हाबाहेर अडकलेल्या जिल्ह्यातील कामगार, मजुरांना आर्थिक मदत ना. संजय राठोड यांचा पुढाकार भोजनासह साबण,सॅनिटायझरचे वितरण
जिल्हाबाहेर अडकलेल्या जिल्ह्यातील कामगार, मजुरांना आर्थिक मदत ना. संजय राठोड यांचा पुढाकार भोजनासह साबण,सॅनिटायझरचे वितरण
Tags
# प्रादेशिक
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
प्रादेशिक
Labels:
प्रादेशिक
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment