भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती घरीच साजरी करावी -अशोक कांबळे देगलूरकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 4 April 2020

भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती घरीच साजरी करावी -अशोक कांबळे देगलूरकर

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती घरीच साजरी करावी - अशोक कांबळे देगलूरकर  



                                                     देगलूर :                                                                               (कोविड ) 19 म्हणजेच कोरोना विषाणू ने जग भरात उद्रेक केला आहे भारतात ही या महा भयंकर आशा कोरोना रोगाने थैमान घातले आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहे या मुळे देशावर महामारीचे संकट आलेल आहे.त्यामुळे यंदा आपण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपापल्या घरातच साजरी करायची आहे.कुणीही कितीही भावनिक असाल तरी कृपया बाहेर पडू नये आपल्या  जमावामूळे  कोरोनाचा धोका अधिक उतभउ शकतो त्याचे चटके आपल्या सह आपल्या देशा ला पण भोगावे लागतील ती परिस्थिती निर्माण होण्या आधी आपल्याला देशा च्या हिता साठी आणि कोरोनाच्या  महामारी वर मात करण्यासाठी आपल्या सहकार्या चीअत्यंत आवश्यकता आहे.त्यामुळे या वेळेस भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती साजरी करण्यासाठी अथवा अभिवादन करण्या साठी आपण आपापल्या विभागातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ अथवा विहाराजवळ जमाव न करता प्रत्येकाने आप आपल्या  घरीच आपल्या कुटुंबासह भारतरत्न  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी  जयंती साजरी करावी. अशी विनंती अशोक कांबळे देगलूरकर यांनी केली आहे.

           

No comments:

Post a Comment

Pages