प्रकल्पाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट (जि . नांदेड ) ने दिले कोरोना प्रतिबंधासाठी भरीव योगदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 5 April 2020

प्रकल्पाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट (जि . नांदेड ) ने दिले कोरोना प्रतिबंधासाठी भरीव योगदान

प्रकल्पाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट  (जि . नांदेड ) ने दिले कोरोना प्रतिबंधासाठी भरीव योगदान
 किनवट : सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने कोरोना ( कोव्हीड- 19 ) च्या प्रतिबंधासाठी विविध प्रकारे मदत कार्यात सहभागी होऊन भरीव योगदान दिले आहे.
             तहसील कार्यालय,किनवट येथे  विलगीकरण कक्षाकरीता शासकिय मुलांचे वसतीगृह, किनवट येथील तीस सिंगल बेड व शासकिय माध्यमिक आश्रम शाळा,मोहपूर येथील  चाळीस गाद्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच शासकिय मुलांचे वसतीगृह ,गोकुंदा (पुर्व ) येथे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 73 परप्रांतीय मजुरांकरिता मदत शिबीर केले आहे.  तेथे वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.


             याप्रकल्पांतर्गत येणाऱ्या सोळा शासकिय माध्यमिक आश्रम शाळेमधील शिल्लक असलेले 7187 दुधाचे पॅक जवळच्या आदिवासी पाड्या -गुड्यातील विद्यार्थी, गरोदर माता यांना वाटप करण्यात आले.  शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा 3 आयुष्मान भारत,
बीव्हीजी पथकातील डॉक्टर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स व फिरते वैद्यकीय पथकामधील डॉक्टर यांचेकडुन शाळा बंद होण्यापुर्वी प्रकल्पांतर्गत सोळा शासकिय माध्यमिक आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांना कोरोना ( कोव्हीड- 19 ) प्रादुर्भाव होऊ नये या करीता प्रतिबंधक उपायाबाबत  मार्गदर्शन करण्यात आले.
              प्रकल्पांतर्गत नामांकित इंग्रजी माध्यमाच्या मातोश्री कमलताई ठमके ईंग्लिश स्कुल, कोठारी ( चि) या शाळेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी अतिदुर्गम भागातील कोलामगुडा , लिंबगुडा व सिडामखेडा या गावातील आदिवासी मधील अति मागास कोलाम जमातीच्या पन्नास गरीब कुटुंबाना अन्नधान्याचे वाटप केले आहे. तसेच नामांकित इंग्रजी माध्यमाच्या महात्मा फुले पब्लिक स्कुल, कुणबीरोड,जळकोट या शाळेमधे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
              शासकिय माध्यमिक आश्रम शाळा, जलधरा येथील क्रीडा शिक्षक संदीप यशीमोड हे किनवट मधील गरीब जनतेला एका वेळचे जेवन देत आहेत. तसेच मदत शिबिरातील लोकांना सोशियल डिस्टंन्सिंगचे अंतर ठेऊन योगाचे शिक्षण देत आहेत.
              या प्रकल्पांतर्गत असलेल्या अटल आरोग्य वाहिणीच्या तीन बीव्हीजी पथकासह सर्व सोईयुक्त 108 अॅम्बुलंस व डॉक्टर यांची सेवा या मोहिमेत घेण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा यांचेकडे वर्ग करण्यात आली आहे.


               डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविली जात असुन या योजने अंतर्गत गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना सहा महिण्याच्या कालावधीसाठी एक वेळचा आहार दिला जात आहे. प्रकल्पांतर्गत न्युक्लिअस बजेट योजने मधुन आदिवासी महिलांना शिलाई-कटाईचे प्रशिक्षण देउन शिलाई मशिन दिली जाते. या योजने अंतर्गत प्रशिक्षित झालेल्या व मशिनचा लाभ घेतलेल्या कनकवाडी येथील महिलांनी कापडापासुन मास्क तयार करुन दिले आहेत. त्यामुळे सदर आदिवासी महिलांना रोजगार मिळाला व राष्ट्रीय आपत्तीच्या मदत कार्यात सहभाग नोंदविता आला. प्रकल्पाधिकारी अभिनव गोयल यांच्या सूक्ष्म नियोजन, नियंत्रण व मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक, शिक्षक, अधिक्षक, डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी कार्य करून किनवटच्या प्रकल्प कार्यालयाने आम्ही फक्त शासनाच्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठीच नसून अशा राष्ट्रीय आपत्तीच्या प्रसंगी विविध क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन भरीव योगदान देत असल्याचं आदर्श उदाहरण सर्व शासकीय यंत्रणांपुढे ठेवलं आहे.

No comments:

Post a Comment

Pages