बँकेतील गर्दी टाळण्यासाठी दिलेल्या तारीखनिहाय नियोजनाप्रमाणे लाभार्थींना रक्कम वाटप करावी -सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 15 April 2020

बँकेतील गर्दी टाळण्यासाठी दिलेल्या तारीखनिहाय नियोजनाप्रमाणे लाभार्थींना रक्कम वाटप करावी -सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल

बँकेतील गर्दी टाळण्यासाठी दिलेल्या तारीखनिहाय नियोजनाप्रमाणे लाभार्थींना रक्कम वाटप करावी
 -सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल
 *किनवट* : पीएम किसान योजनेची व महाराष्ट्र शासनाकडील अमृत आहार योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केलेली आहे. त्यामुळे रक्कम काढण्यासाठी बँकेत गर्दी होणार आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यासाठी  नियोजन करून दिलेल्या खाते क्रमांकाच्या लाभार्थींना तारीखनिहाय रक्कम वाटप करण्याचे आदेश सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.
          संपूर्ण देशात सध्या कोरोना ( कोविड - १९ ) या विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संसर्ग साखळी तोडण्यासाठी देशात दिनांक १४ एप्रिल पर्यत लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला होता , ज्याची मुदत संपल्याने राज्य शासनाने राज्यातील कोरोना संसर्ग परिस्थितीचा विचार करता सदर कालावधी ३० एप्रिल पर्यंत वाढविण्याबाबत संकेत दिलेले आहे.
          मात्र, भारत सरकारने प्रधानमंत्री गरिब कल्याण योजना , पीएम किसान योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. ज्याची रक्कम लाभार्थ्यांचे खात्यावर जमा केलेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडील अमृत आहार योजनेची अंमलबजावणी करण्याकामी सध्याची परिस्थिती पाहता अडचण निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत सदर लाभार्थी यांना द्यावयाची रक्कम नगदी स्वरूपात अदा करणे गरजेचे आहे.
          त्यासाठी पुढीलप्रमाणे तारीखनिहाय नियोजन देण्यात आलेले आहे: ताखीख ( कंसात खात्याचा शेवटचा क्रमांक ) : १५, २२ व २९ एप्रिल ( ०० ते ०१ ), १६, २३ व ३० एप्रिल ( ०३ ते ०३ ), १७ व २४ एप्रिल ( ०४ ते ०५ ), २० व २७ एप्रिल ( ०६ ते ०७ ), २१ व २८ एप्रिल ( ०८ ते ०९ ).
          याप्रमाणे लाभार्थ्यांना रक्कम वाटप करावी. सर्व बँकांचे शाखाधिकारी, पोलिस अधिकारी व सबंधित यंत्रणेचे अधिकारी यांनी या प्रकरणात निष्काळजीपणा केल्यास वा दिरंगाई केल्यास संबधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग प्रतिबंध कायदा १९८७ मधील उचित कलमान्वये कारवाई करण्यात येईल याची दक्षता घ्यावी,असा इशारा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आदेशान्वये दिला आहे. तसेच लाभार्थींनी दिलेल्या तारीखनिहाय रक्कम स्विकारण्यास बँकेत जावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages