नांदेड शासकीय तंत्रनिकेतमध्ये वर्क फ्रॉम होमचा यशस्वी उपक्रम
नांदेड दि. 18 :- पदविका अभ्यासक्रमाचे सम सत्र संपण्यास तीन आठवड्याचा कालावधी असतांना कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन घोषीत झाले. यामुळे अध्यापनाचे कार्य थांबले व विद्यार्थ्यांना आपआपल्या घरी पाठविण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, सहसंचालक महेश शिवणकर यांच्या कुशल नियोजनाने उर्वरीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्यादृष्टीने वर्क फ्रॉम होम हा उपक्रम प्राचार्यांच्या मार्फत राबविण्याचे निश्चित झाले. नांदेड शासकीय तंत्रनिकेतमध्ये विभाग प्रमुख व अधिव्याख्यातांच्या सहाय्याने वर्क फ्रॉम होम यशस्वी करुन दाखविला आहे.
नांदेड शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व शाखेतील विभाग प्रमुख, अध्यापक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे व्हॉटस अप ग्रुप तयार केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे असणारी स्मार्ट फोनची अनुपलब्धता इंटरनेटची अनुपलब्धता इत्यादी अडचणी असतांनाही 60 ते 70 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे शक्य झाले. विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी शैक्षणिक माहिती उर्वरीत अभ्यासक्रमावरील नोट्स, असाईनमेंट्स, सराव परीक्षा, अभ्यास उपयोगी वेबसाईट्स, पावर पॉइंट प्रेसेंटेशन्स, मूल्य मापनासाठी प्रश्नावली, ऑनलाइन ऑडिओ आणी व्हिडीओ इत्यादी गोष्टी विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात आल्या. यासाठी व्हॉटस अप ग्रुप, झूम, मूडल, ईझिक्लास, गूगलक्लास रूम, यूट्यूब इत्यादी दृकश्राव्य साधनांचा प्रभावी उपयोग करण्यात आला.
विद्यार्थ्यांना सरावासाठी ऑनलाइन टेस्ट सिरिज, क्विजेस, असाईनमेंट्स इत्यादी देण्यात आले व त्याचे ऑनलाइन मूल्यमापन करण्यात आले. सर्वच विषयांचा उर्वरीत अभ्यासक्रम नियोजीत वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. वर्क फ्रॉम होम या उपक्रमाबद्दल असंख्य विद्यार्थी, आणि पालकांनी व्हॉटस अपच्या माध्यमातून प्रतिक्रिया पाठवून समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांसोबतच शासनाच्या मार्गदर्शनाने अध्यापकांनीही विविध ऑनलाइन कोर्सेसला प्रवेश घेवून गुणवत्ता वाढीवर भर देण्याचा यशस्वी प्रयत्नही या लॉकडाऊन काळात करण्यात आला. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य तथा स्थापत्य विभाग प्रमुख पी .डी. पोपळे, उपयोजीत यंत्र शास्त्र विभाग प्रमुख डी. एम. लोकमनवार, यंत्र विभागप्रमुख आर. एम. सकळकळे, विद्युत विभागप्रमुख व्ही.व्ही. सर्वज्ञ, स्थापत्य विभागप्रमुख एस पी कुलकर्णी, उत्पादन विभागप्रमुख एस. एम. कंधारे, यंत्र विभागप्रमुख एस. एस. चौधरी, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख एस. एन. ढोले, वैद्यकीय अणुविद्युत विभागप्रमुख बी. व्ही. यादव, विज्ञान विभाग नियंत्रक एस. आर. मुधोळकर यांनी प्रयत्न केले, अशी माहिती शासकीय तंत्रकिनकेतनचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी दिली आहे.
00000
Monday 20 April 2020
Home
Unlabelled
नांदेड शासकीय तंत्रनिकेतमध्ये वर्क फ्रॉम होमचा यशवी उपक्रम
नांदेड शासकीय तंत्रनिकेतमध्ये वर्क फ्रॉम होमचा यशवी उपक्रम
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment