सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची २४ रोजी सकाळी ७.३० वा. आकाशवाणी नांदेड केंद्रावरून मुलाखत प्रसारीत होणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 23 April 2020

सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची २४ रोजी सकाळी ७.३० वा. आकाशवाणी नांदेड केंद्रावरून मुलाखत प्रसारीत होणार

किनवट: कोरोनाचा संसर्ग जगभरगतीने फैलावतो आहे. नांदेड जिल्ह्याचं शेवटचं टोक असलेला किनवट उपविभाग. यामध्ये अतिदुर्गम, डोंगरी व आदिवासी किनवट व माहूर तालुक्याचा समावेश होतो. ह्या भागाला कोरोना बाधीत तेलंगाणाची राज्यसीमा व विदर्भाची सीमा जोडली आहे. अशा संवेदनशील स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजना याविषयी सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची मुलाखत शुक्रवार दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजता आकाशवाणी नांदेड केंद्रावरून  प्रसारित होणार आहे.  वरिष्ठ निवेदक गणेश धोबे यांनी ही मुलाखत घेतली आहे. अशी माहिती आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी नंदादीपक बट्टा यांनी दिली आहे. सर्वश्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार नरेंद्र देशमुख व जनजागृती कक्षाचे प्रमुख गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages