बुद्धगया बिहारच्या जखमी मजुरांना आंबेडकरवादी मिशन निवारासाठी आश्रय - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 19 May 2020

बुद्धगया बिहारच्या जखमी मजुरांना आंबेडकरवादी मिशन निवारासाठी आश्रय

नांदेड :

सोलापूर येथील पॉवरलूम  येथे काम करण्याऱ्या " बुद्धगया औरंगाबाद बिहारच्या मजुरांना घेऊन जाणारी खाजगी ट्रॅव्हल्सचा माळाकोळी ता. लोहा जि. नांदेड अपघात झाला त्यात 2 व्यक्ती मृत झाले , जखमी  कामगाराचे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून या अपघातातील 15 कामगारांना आंबेडकरवादी मिशन (सुभेदार रामजी मुलाच्या) वसतिगृहात ठेवण्यात आले आहे.

स्वतः  जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, उपजिल्हाधिकारी बोरगावकर, तहसीलदार परळीकर, नायब तहसीलदार कांबळे आदींनी मिशन केंद्रास भेट देऊन जखमी प्रवाशी  कामगार विचारपूस केली, मिशन च्या विध्यार्थानी चहा बिस्कीट, पाणी  देऊन तात्काळ सेवा केली, राहण्यासाठी खोल्या तयार करून दिल्या कोरोनाच्या या संकट काळात  कामगार मजुरांचे हाल पाहुण मन हेलावून जात आहे, त्यांची पूर्ण सेवा सुविधा आंबेडकरवादी मिशन पूरवेल  असे या प्रसंगी दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी स्पष्ट केले..


No comments:

Post a Comment

Pages