नांदेड, दि. 18 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयात फक्त नवीन वाहन नोंदणीचे व खटला विभागातील शासकीय दंड व कर स्विकारण्याचे कामकाज सुरु राहील. नवीन नोंदणीचे कामकाज हे वाहन वितरकाच्या आवारात होणार असल्याने वाहनधारकांनी कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यास्तव प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळोवेळी उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश 17 मे 2020 अन्वये प्रादेशिक परिवहन कार्यालयात 10 टक्के लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालय सोमवार 18 मे 2020 पासून सुरु करण्याबाबत निर्देश दिले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी नमूद केले आहे.

No comments:
Post a Comment