नांदेड जिल्ह्यातून गावाकडे जाण्यासाठी इच्छूकांनी परवानगीकरिता लिंक सुविधेचा लाभ घ्यावा. -सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 3 May 2020

नांदेड जिल्ह्यातून गावाकडे जाण्यासाठी इच्छूकांनी परवानगीकरिता लिंक सुविधेचा लाभ घ्यावा. -सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल


 किनवट : नांदेड जिल्ह्यातील कँटोन्मेंट झोन ( Containment zone ) च्या बाहेर असणाऱ्या लोकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास त्यांना  लिंकवर क्लिक करून माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, याचा ईच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
           माहिती भरताना फक्त पुढील दोन कागदपत्रेच अपलोड (Upload ) करायची आहेत. नजीकच्या काळातील स्पष्ट फोटो, 200 केबी साईज पर्यतचा (File Size 200 kb पर्यंत) व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (Registered Medical Practitioner) यांचे कुठल्याही फ्लू सदृश्य आजार नसल्याचे प्रमाणपत्र, 500 केबी साईजपर्यंत  ( File size 500 KB  पर्यंत)
सदरील दोन कागदपत्रे https://covid19.mhpolice.in/  या  लिंकवर अपलोड केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून त्याची नोंद घेऊन काही वेळेतच पुढील प्रक्रिया केली जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात या व्यवस्थेसाठी दहा संगणक कार्यान्वित करून खास दक्षता घेतली जात आहे. सर्वांनी सहकार्य करावे.
          याकरिता कृपया आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्रे किंवा अन्य कोणतीही कागदपत्रे अपलोड करू नयेत. तसे केल्यास पास देण्याची पुढील प्रक्रिया करता येणार नाही. त्याकरिता अनावश्यक  कागदपत्रे अपलोड करू नये, अशा विनंती प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.  याकरितासंकेतस्थळ:
https://covid19.mhpolice.in/
हे असून अधिक माहितीसाठी पुढील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
(02462 ) 249279 व (02462 )  235077 तसेच collectornanded1@gmail.com या ई मेलवर सुद्धा संदेश देता येईल , अशी सुविधा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
तथा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे किनवटचे तहसिलदार नरेंद्र देशमुख यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Pages