नांदेडला 1 हजार 358 संशयितांची नोंद ; घेण्यात आलेल्या 1 हजार 199 स्वॅब पैकी 1 हजार 55 जणांचा अहवाल निगेटिव्ह - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 3 May 2020

नांदेडला 1 हजार 358 संशयितांची नोंद ; घेण्यात आलेल्या 1 हजार 199 स्वॅब पैकी 1 हजार 55 जणांचा अहवाल निगेटिव्ह

नांदेड,दि. 3 :- कोरोना विषाणु संदर्भात आज रविवार 3 मे 2020 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत नांदेड येथे 1 हजार 358 संशयितांची नोंद झाली आहे. त्याची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे. घेण्यात आलेले स्वँब 1 हजार 199 असून पैकी 1 हजार 55 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर  93 स्वँबचा अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत 5 स्वँब तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. तसेच 16 जणांचा निष्कर्ष निघालेला नाही. एकुण घेण्यात आलेले स्वँब 1 हजार 199 पैकी आतापर्यंत 29 रुग्णाचा स्वँब पॉझीटिव्ह आहेत. यापैकी औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत रुग्णाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

आज रविवार 3 मे 2020 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंजाब राज्यापर्यंत वाहन सेवा पुरवणारे परत आलेले 2 वाहन चालक यांचा अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाला आहे. यामुळे पुर्वीचे 2 वाहन चालक आणि त्यांचा एक मदतनीस यांच्यासह एकुण 5 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तसेच आज देगलूर रोड येथील एका महिलेचा देखील स्वँब पॉझीटिव्ह प्राप्त झाला असून या महिलेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

श्री गुरुद्वारा परिसरातील 20 रुग्ण हे कोरोना विषाणुळे बाधित आढळून आले आहेत आणि 25 व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह आहेत.

नांदेड अबचलनगर येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल हा रविवार 26 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला होता. या रुग्णाची प्रकृती स्थीर आहे. तसेच त्यांच्या निकटवर्तीय संपर्कातील व्यक्तींचे स्वँब अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

श्री गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील भाविकांना पंजाब राज्यापर्यंत वाहन सेवा पुरवणारे 2 वाहन चालक आणि त्यांचा एक मदतनीस यांचाही स्वॅब अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाला आहे. सद्यस्थितीत या रुग्णांवर शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. यामधील लोहा तालुक्यातील किवळा येथील रुग्णाचे एकुण 5 निकटवर्तीय व्यक्तीचे स्वॅब घेण्यात येवून कोविड केअर सेंटर तालुका लोहा आणि उर्वरीत 4 व्यक्तींना कंधार येथे अलगीकरण करण्यात आले आहे.

त्यामुळे जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages