किनवट - माहूर तालुक्यातील डोंगरी भागात आदिवासी गोंडी बोलीभाषेतील चित्रगीतातून प्रशासनाच्यावतीने कोरोना जाणीव जागृती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 27 May 2020

किनवट - माहूर तालुक्यातील डोंगरी भागात आदिवासी गोंडी बोलीभाषेतील चित्रगीतातून प्रशासनाच्यावतीने कोरोना जाणीव जागृती

किनवट, दि. २७ : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून किनवट - माहूर तालुक्यातील आदिवासी बहुल दुर्गम, डोंगरी भागात गोंडी बोलीभाषेत, पारंपारिक  संगीतात कोरोनाविषयी जाणीव जागृती चित्रगीतातून प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
                  जनजागृती कक्ष प्रमुख गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कक्षाचे सहायक उत्तम कानिंदे यांनी या गीतांची निर्मिती केली असून दिग्दर्शन सुद्धा त्यांचंच आहे. प्रदीप कुडमेथे यांचं हे गोंडी गीत असून वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी गाईलं आहे. या गीताचं वैशिष्ट्ये म्हणजे चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीत प्रविष्ठ विद्यार्थी निवेदक कानिंदे यांनी छायाचित्रण, ध्वनीमुद्रण, मिश्रण व संकलन केलं आहे. प्रज्ञाचक्षू कलावंत अनिल उमरे यांनी संगीत दिलं असून सूरज पाटील यांनी तबला व साहेबराव वाढवे यांनी ढोलकीची साथसंगत दिली. राष्ट्रदीप कयापाक यांनी ध्वनीक्षेपण यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.
                  यामध्ये प्रदीप कुडमेथे, निर्मला माधव मेश्राम, शंकर गेडाम, रमेश मुनेश्वर, रूपेश मुनेश्वर, बाबूराव इब्बितदार, प्रा.डॉ. पंजाब शेरे, राजा तामगाडगे, भूमय्या इंदूरवार, नागोराव कुमरे व मर्कागुडा घोटी येथील समस्त गावकरी यांनी सहभाग घेतला आहे.
                  या उपक्रमासाठी तहसिलदार नरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे व वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे यांनी प्रोत्साहन दिले आहे.

No comments:

Post a Comment

Pages