नांदेड, दि 27: कोरोना या महासंकटाला आवर घालण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. ७० दिवसाच्या या काळात हातावर पोट असणाऱ्या लोकांचे बेहाल सुरु झाले, असंख्य कामगारावर उपासमारी ओढवली त्या सर्वांची भूक भागवण्यासाठी आश्रयदाता म्हणून पुढे आलेल्या आंबेडकरवादी मिशन नांदेड चे प्रमुख आदरणीय दीपक कदम सर यांनी तबल साडे तीन हजार कुटुंबियांना घरपोच अन्नधान्य व इतर संसार उपयोगी साहित्य पुरविले, कसल्याही प्रकारचा गाजावाजा न करता गोरगरिबांची चूल पेटली पाहिजे, त्यांची भूक भागावी म्हणून ७० दिवस झाले सर कष्ट घेत आहेत.
मंगळवारी दीपक कदम सर मिशन मध्ये अभ्यासिकेत बसले होते, मिशन मध्ये सफाईकामगार असलेल्या संजय मोकलवाड हा पुढे आला अन काहीच न बोलता अश्रू गाळू लागला, थोडा वेळ काय झाले कळले नाही.सरानी त्याला धीर देत विचारले तर तो म्हणाला मुलीचे लग्न आडले आहे, ३ जून २०२० तारीख आहे, घरात काहीच नाही ५० पाहुणे जमवून लग्न करूत म्हणत आहेत पाहुणे.सर म्हणाले, "काही काळजी करायची नाही, लग्नासाठी लागणारे धान्य, कपडे आणि दागिन्यांचा खर्च आंबेडकरवादी मिशन करेल. तू कामाला लाग." लगेच त्या वेळी त्याच्या घरी धान्य पाठवले आणि इतर खर्चासाठीचा धनादेश संजय आणि त्याच्या पत्नीच्या हातात सुपूर्द केला .
डबडबत्या डोळ्यांनी मिशन मध्ये आलेल्या सफाईकामगार आनंदअश्रू गाळात बाहेर पडला.महत्वाचे म्हणजे आंबेडकर वादी मिशन उभारलेल्या मुलांच्या वसतिगृहाचे लोकार्पण कोणत्याही तथाकथित बुद्धिजीवी अथवा राजकीय लोकांना न बोलावतात याच संजयच्या हस्ते करून एक नवा पायंडा सरांनी घालून दिला आहे.
जयवर्धन भोसीकर
Wednesday, 27 May 2020
Home
प्रासंगिक लेख
आंबेडकरवादी मिशन ने मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली;अन पित्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले
आंबेडकरवादी मिशन ने मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली;अन पित्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले
Tags
# प्रासंगिक लेख
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
प्रासंगिक लेख
Labels:
प्रासंगिक लेख
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.


No comments:
Post a Comment