नांदेड :
मानवलोक समाजकार्य माजी विद्यार्थी संघ अंबाजोगाई व लोकानुबंध सेवाभावी संस्था गुंज यांच्या वतीने स्वा.रा.ती.म.विद्यापीठ नांदेड मधील सामाजिक शास्त्रे संकुल मधील सामाजिक कार्याच्या प्राध्यापिका प्रतिमा कांबळे ह्या त्यांच्या मुळ गावी अंबाजोगाई कोरोना या महामारीमध्ये खरोखरच ज्या गरजूंना अन्न,धान्य व जीवनावश्यक वस्तुंची गरज आहे त्या कुटुंबाची यादी करून सामाजिक भान जपत त्या गरजू कुटुंबा पर्यंत जाऊन किटचे वाटप करत आहेत.
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगात लॉकडाउन असल्यामुळे ज्या कुटुंबाचे हातावर पोट होते त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.हेच लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत अंबाजोगाई मधील सारसा,देवळा,अकोला,कुंबेफळ,सातेफळ,(वाघाळा कारखाना) या गावात आतापर्यंत 100 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक किटचे वितरण मानव लोकचे प्राचार्य प्रकाश जाधव,प्रा.हनुमंत सालुंखे व अजित कांकरिया यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यांच्या या सामाजिक कार्यात फुले-शाहु-आंबेडकर युवा मंच,नांदेड ने छोटीशी आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
Saturday 2 May 2020
प्रा.प्रतिमा कांबळे यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वितरण.
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment