प्रासंगिक :: कोरोना विळख्यातील नांदेड शहर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 2 May 2020

प्रासंगिक :: कोरोना विळख्यातील नांदेड शहर

आज भारतच नव्हे तर आख्या जगामध्ये कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे आणि येणारा पुढील काळ सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा आणि जीवघेणा ठरणारा आहे. नांदेडमधील मधील प्रशासन आपलं काम चांगल्या प्रकारे पार पाडत असताना नांदेड मध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीला जबाबदार कोण ,श्रेय कोण घेणार यांच्या भानगडीत पडण्या पेक्षा या परिस्थितीवर निवारण कशा प्रकारे करता येईल यावर सर्वानी लक्ष देणे गरजेचे आहे. आज नांदेडमध्ये असलेल्या गुरुद्वारा लंगर मधील  20 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलंय ही बातमी पाहून नांदेडमधील जनतेची झोप उडाली आहे. गुरुद्वारा येथील हे कर्मचारी हे कोनाकोणाच्या संपर्कात आली होती व ते कोणाच्या संपर्कात गेले होते याची अजून माहिती अद्यापही मिळाली नाही. अश्यातच काही दिवसांपासून नांदेडमधील काही भागात गुरुद्वारा लंगर यांच्या सेवेतून अन्नदान सेवा पुरवली जात होती जर ही सेवा पुरवणारी लोक त्या 20 कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आली असतील तर कोरोनाचे रुग्ण वाढण्याची खूप शक्यता आहे अशी भीती आणि शंका आज सामान्य माणसाच्या मनात घर करून बसली आहे व नांदेडमधील जनतेमधे भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. तरी पालकमंत्री आणि खासदार यांनी प्रशासनाच्या मदतीने ह्या लंगर सेवा बंद करून ज्या ठिकाणी ह्या सेवा पुरवल्या जात होत्या त्या भागात, खासकरुन दलित वस्ती येथील लोकांची corona test आणि Medical check करण्यात यावे ही विनंती आहे . तसेच गुरुद्वारा लंगर याचे मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळे आज नांदेडमधील चार लाख गरीब लोकांना दोन वेळेचे जेवण देत आहे सलाम तुमच्या कार्याला पण सध्याची जी परिस्थिती नांदेडमध्ये उदभवली आहे त्यानुसार आपन ही सेवा तात्पुरती बंद करावी . तसेच जिल्हा प्रशासन यावर योग्य ती भूमिका घेऊन योग्य व काटेकोरपणे कार्यवाही करील  आशी अपेक्षा आम्ही बाळगतो आणि आपलं नांदेड शहर पुन्हा  पहिल्या सारख Green गटात येईल अशी आशा करतो जय हिंद, जय महाराष्ट्र

प्रशिक गायकवाड नांदेड

No comments:

Post a Comment

Pages