महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक विकासाचे शिल्पकार - डॉ हर्षदीप कांबळे. - दीपक प्रभाकर भिंगारदेव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 18 May 2020

महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक विकासाचे शिल्पकार - डॉ हर्षदीप कांबळे. - दीपक प्रभाकर भिंगारदेव

मागच्या वर्षी 15 नोव्हेंबरला वरळीच्या डोम स्टेडियम वरती लाखोंचा उद्योजकांचा मेळाव्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय फडणवीस साहेबांनी जाहीर रित्या नमूद केले की ह्या CMEGP च्या संकल्पनेतून राज्यतल्या युवकांचे भविष्य आणि त्यासोबत महाराष्टाचा विकास पूर्णतः बदल नार आहे व त्यासाठीचे श्रेय आपल्या उद्योग खात्याचे सचिव/ आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे ह्यांना प्रामुख्याने जाते. व त्याचे शिल्पकार म्हणून डॉ हर्षदीप कांबळे यांचे नाव आपले राज्य नेहमीच घेत राहील.

अवघ्या तीन वर्षात महाराष्ट्राचे संपूर्ण औद्योगिक चित्र बदलण्यासाठी डॉ.हर्षदीप कांबळे सरांनी जी किमया यशस्वीरीत्या अवघ्या दोन वर्षात इतक्या यशस्वीरीत्या राबविली की राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात उद्योजकतेचे बिज तळागाळात रोवल्या गेले व त्याचा प्रसार सगळ्या युवक/युवती मध्ये जाऊन त्यांचे भविष्य दैदिप्यमान दिसून येईल.

खरे तर डॉ.हर्षदीप कांबळे सर जेव्हा राज्यातल्या औद्योगिक विभागात रुजू झाले  तेव्हा  उद्योग खात्यालाच अत्यन्त मरगळ आली होती. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तर बंद करण्याची वेळ आली होती. औद्योगिक विभागाला काहीच काम नसल्यामुळे तो विभाग जिल्ह्या परिषदेत विलीन करावा अशा वावड्या उठत होत्या. ही गोष्ट डॉ.कांबळे यांच्या लक्षात आल्यावर त्यानी रात्र दिवस एक करून संपूर्ण उद्योग खात्यात चैतन्य आणले. अनेक योजना ह्या धूळ खात होत्या त्यांना कार्यान्वित केले व अवघ्या काही महिन्यात चैतन्याचे वारे वाहू लागले.

महाराष्ट उद्योजकता विकास केंद्रात जी शिथिलता आली होती ती तर त्यांनी त्वरित नाहीशी केली.  राज्यातल्या हजारो युवकांना उद्योजकतेचे, प्रशिक्षण मोफत दिले, विशेष म्हणजे हे सगळे अनुसूचित जातीचे होते व त्यात महिलांचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात होते.

युवक-युवती अठरा दिवस निवासी मोफत प्रशिक्षण घेऊन छोट्या मोठ्या उद्योगातून आपल्या पायावर उभे राहावे ही डॉ.कांबळे यांचे स्वप्न आता खरे होताना दिसत होते. पण ह्या उद्योजकांनी काही तरी मोठे उद्योग करावे अशी खंत डॉ.कांबळे नेहमी बैठकीत सांगवुन दाखवीत आणि मग त्यांनी अक्षरशः सगळे मंत्रालय उलटे पालथे घालून CMEGP ची कर्ज योजना युवक युवतीसाठी आणली. राज्यातल्या युवक युवतींना उद्योगासाठी फार तर पन्नास हजर ते काही लाख कमी मिळायचे पण आता CMEGP च्या अंतर्गत पन्नास लाखापर्यंत त्यांनी कर्ज मिळेल ह्याची तजवीज CMEGP ह्या योजने अंतर्गत करून ठेवली.

औरंगाबादच्या दाभाडे ह्याने REDP चे प्रशिक्षण जानेवारी २०१९ मध्ये घेतले. इंजिनिअर असूनही त्याला काही सुचत नव्हते मात्र REDP केला आणि अवघ्या सहा महिन्यात दाभाडे दुबईला फळ भाज्या निर्यात करू लागला.  नागपूरची सीमा मेश्राम प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वतःचा एकटीचाच विचार न करता अजून काही महिलांना सोबत घेऊन सहा करोडचे अगरबत्तीचा क्लस्टर नागपूर येथे स्थापित करीत आहे. हिंगोलीच्या साहेबराव भूतकरने प्रशिक्षणानंतर घरची गरिबीचे कारण कारण न दाखवता, आज पन्नास लाखाची तेलघाणी यशस्वीरीत्या सुरु केली आहे.

आज राज्यात असे हजारो दाभाडे, मेश्राम आणि भुतकर,डॉ हर्षदीप कांबळे सरांनी अवघ्या दोन अडीच वर्षात उभे केले आहेत. हे हजारो युवक सरकार पुढे दिनतेने हात न पसरता सरकारलाच गर्वाने लाखो करोडोंचा टॅक्स देणार आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित सक्षम दलित समाज निर्माण करण्याचे महान कार्य डॉ. हर्षदीप कांबळे सरांनी एक हाती करून दाखविले आहेत. व इतर सगळ्यांसाठी एक जाज्वलय जिवंत उदाहरण साक्षात उभे केले आहे.

प्रशिक्षण व उद्योग  उभा करून उद्योजकांचे काम भगत नाही तर, उद्योजकांना त्यांच्या मालासाठी बाजारपेठ तयार करणे सुद्धा महत्वाचे ठरते. डॉ.हर्षदीप कांबळे सरांनी दिल्लीला पोस्टिंग असताना अनुसूचित जातीच्या उद्योजकांना PSU मध्ये ४ टक्के माल घेण्यासाठी सरकारी आदेश काढून घेतले. मागील तीन वर्षात डॉ हर्षदीप कांबळे सरांनी अनुसूचित जातीच्या उद्योजकांना प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा बाजारपेठ मिळावी म्हणून मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद येथे मोठ मोठे मेळावे घेतले. त्यात उद्योजकांचे प्रॉडक्ट एक्सिबिशन पण ठेवले व त्याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उदयोजक, कंपन्या व पब्लिक सेक्टर जसे की, रेल्वे खाते, बजाज इत्यादी कंपन्यांना बोलावून तेथे उद्योजकांना काय उद्योग संधी मिळू शकते ह्याची जाणीव करून दिली. झी टीव्हीचे सुभाष चंद्रा, कल्पना सरोज सारखे दिग्गज उद्योजक जे पद्मश्री देऊन सन्मानित केले होते. त्यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते.  औरंगाबाद येथील चौका येथील विहारात थायलंडचे सर्वात मोठे उद्योजक त्यांचा जगामध्ये  दोन नंबरचा असलेला  जहाजाचा  मोठा उद्योग होता यांचे पण व्याख्यान आयोजित केले होते. अशा असंख्य आठवणी सांगता येतील.

CMEGP ची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात होण्यासाठी कांबळे सर यांनी WTC, मुंबई, MTDC लोणावळा येथे बँकर्स, अधिकाऱ्यांसाठी भव्य परिषद आयोजित करून CMEGP ची अंमलबाजवणी करण्यासाठी व युवक युवतींना मोठ्या प्रमाणात फायदा होण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राला तर त्यांनी विलक्षण प्रेम दिले व त्या माध्यमातून राज्यातल्या प्रत्येक अनुसूचित जाती-जमातीच्या युवकांपुढे आशेचा किरण जागृत केला. युवक युवतींना फक्त उद्योजकतेचे प्रशिक्षण न देता त्यांना उच्च दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षण पण दिले. IGTR, CIPET सारख्या संस्थे सोबत समन्व्य साधून हजारो युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामध्ये महिलांसाठी विशेष हॉस्टेलसाठी पण करोडो रुपयांचा निधी प्राप्त करून दिला.


महाराष्ट उद्योजकता विकास केंद्रा तर्फे प्रकाशित होणार ''उद्योजक'' मासिकाकडे त्यांनी विशेष लक्ष देऊन, मासिकाला रंगीत करून दर्जेदार करण्यासाठी जातीने लक्ष पण दिले व त्यासाठी मुद्दाम लिखाण नियमित केले. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रासाठी मुंबई येथे भव्य दिव्य कार्यालय करून अमेरिकेतल्या विद्यापीठाशी संलग्नता करण्याची योजना पण आता लवकरच अंमलात येईल.सामाजिक व  धार्मिक कार्यात रममाण असलेले डॉ.हर्षदीप कांबळे सर राज्याच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहेत. हजारो युवकांना उद्योजकतेचे प्रशिक्षण, महारष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा तालुक्यात विविध उद्योगाचे शेकडो क्लस्टर्स उभे करून ह्या महाराष्ट्र राज्याला डॉ.हर्षदीप कांबळे सर त्यांच्या बहुमूल्य योगदानामुळे संपूर्ण देशामध्ये नंबर वन करतीलच त्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र प्रत्यक्षात अस्तित्वात आंतील त्याबद्दल राज्यातल्या युवक युवतींना खात्री आहे. ह्यात कुणालाही दुमत असण्याचे कारण नाही.

दीपक प्रभाकर भिंगारदेव
माजी सहाय्य्क संचालक,
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, औरंगाबाद


















































































































































































































































No comments:

Post a Comment

Pages