निराधारांचा मित्र आणि अनाथाचा आश्रयदाता बुद्ध कालीन दानशूर अनाथपिंडक म्हणजे डॉ हर्षदीप कांबळे सर - प्रसेनजित केरबा वाघमारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 18 May 2020

निराधारांचा मित्र आणि अनाथाचा आश्रयदाता बुद्ध कालीन दानशूर अनाथपिंडक म्हणजे डॉ हर्षदीप कांबळे सर - प्रसेनजित केरबा वाघमारे



लॉकडाऊन परिस्थितीत गरजू कुटुंबांसाठी वर्गमित्रांनी केलेली छोटीशी मदत डॉ.हर्षदीप कांबळे सर यांच्या सहकार्याने एखाद्या पर्वता एवढी झाली सरांच्या सहकाऱ्यांनी एक दोन नसून तब्बल 500 कुटुंबांना मदत करता आली ते शक्य झाले सरांच्या दानशुरते मुळे कारण आम्ही मित्रांनी केलेली मदत ही मर्यादित 200 कुटुंबाना केली असल्याची डॉ हर्षदीप कांबळे सर यांना माहिती दिली व लॉकडाऊन परिस्थितीमुळे सिडको नविन नांदेड तसेच आजूबाजूच्या परिसरात असे अनेक कुटुंब आहेत की ज्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यांच्यापुढे उपासमारीचे संकट उभे आहे असे सरांना सांगितल्यानंतर सरांनी क्षणाचाही विलंब न लावता 500 गरजू परिवारांना आपण  मदत करूया असे मला सांगितले आज पर्यंत आम्ही ती मदत गरजू कुटुंबांना पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत आज 18 मे रोजी सरांचा वाढदिवस असल्या कारणाने मला माझ्या शब्दात सरांविषयी मला काही लिहावेसे वाटते दान शील संयम या तीन सत्कर्माचा परिपाक म्हणजे डॉ.हर्षदीप कांबळे सर आपण जे काही आहोत ते आपले आदर्श तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा परिणाम आहे अविचारी बनवू नका आपल्या विचारावर लक्ष असू द्या असे सांगणारे डॉ हर्षदीप कांबळे सर निष्काळजीपणाचा अधीन होऊ नका आळसा पासून दूर रहा जागरूक युवक चिंतनशील असतो असे सांगणारे डॉ.हर्षदीप कांबळे सर सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून उच्चशिक्षणावर ,उच्चसंस्कृतीवर अवलंबून आहे .बौध्द जीवनमार्ग हा आदर्श जीवनमार्ग आहे असे ठणकावून सांगणारे डॉ हर्षदीप कांबळे सर.जो जागरूक आहे स्मृतिमान आहे सुविचारपूर्वक काम करणार आहे जो संयमी आहे अशा युवकांचे यश सारखे वाढत असते सम्यकमार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका हा बुद्धिमान व्हा न्यायी व्हा सत्संगती धरा प्रज्ञाशुद्धीचा एकमेव मार्ग आहे.असे युवकांमध्ये विचार पेरणारे आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे उद्योग सचिव/आयुक्त मा.डॉ हर्षदीप कांबळे सर(IAS) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक  सदिच्छा !


                     नमो बुद्धाय जय भिम !

                     प्रसेनजीत केरबा वाघमारे
                    सिडको नविन नांदेड

No comments:

Post a Comment

Pages