"टूटने लगे होसले तो ये याद रखना,
बिना मेहनत के तख्तों-ताज नही मिलते,
ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिल अपनी,
क्योकि जुगनू कभी रौशनी के मोहताज नही होते…"
मेहनत, जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न सर्वांनीच केले पाहीजे. तथागत गौतम बुद्धदेखील आपल्या विचारांमधून आपल्याला सांगतात की स्वयंप्रकाशीत व्हा. आयुष्याची उभारी घेताना आयुष्यातल्या संकटांना तोंड देण्याची तयारी सर्वांनी ठेवलीच पाहिजे. परिस्थितीवर मात करून योग्य निर्णय घेण्याची धमक दाखवत यशाच्या आकाशाला गवसणी घालण्यासाठी भरारी घेणारा व्यक्तीच यश काबीज करू शकतो या उदाहरणाचं नाव म्हणजे " डॉ. हर्षदीप कांबळे सर"
लहानपाणापासूनच जिद्द बाळगणाऱ्या या व्यक्तीने आपल्या आयुष्यातले सर्व चढउतार अगदी भक्कमपणे पार केले. मनात दृढ निश्चय केला की आपलं ध्येय कुठल्याही परिस्थिती काबीज करता येतं हे जगाला दाखवून दिलं आणि "IAS" पदवीचा मानाचा तुरा आपल्या शीरपेचात रोवला.
लोकुत्तरा महाविहार आणि ग्लोबल बुद्धिस्ट कॉंग्रेगेशनच्या माध्यमातून मी पुन्हा तेच नाव कानावर पडायला लागलं "डॉ हर्षदीप कांबळे". समाजासाठी धडपडणारा कुणीतरी मोठा अधिकारी. आंबेडकरी चळवळीत सक्रिय असल्यामुळं त्यांनी निर्माण केलेल्या ग्लोबल बुद्धिस्ट कॉंग्रेगेशन आणि लोकउत्तरा महाविहाराच्या कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळाली. एक मोठ्या पदावरचा अधिकारी अगदी सामान्य माणसासारखा सगळ्यात मिळून मिसळून काम करताना दिसत होता. तरुणपोरांच्या गराड्यात त्यांना तरुण म्हणून वागताना पाहिलं. थोरा-मोठयांच्या घोळक्यात त्यांना आदारातिथ्याने वावरताना पाहिलं आणि त्यांची वेगळीच छाप माझ्या मनावर कोरल्या गेली.
खरं तर खास सरांसोबत जवळून काम करण्याचा अनुभव ग्लोबल बुद्धिस्ट कॉंग्रेगेशनच्या ऑनलाइन इव्हेंट च्या माध्यमातून मला आला. एवढा मोठा अधिकारी व्यक्ती आम्हा युवकांसोबत राहून आमच्या वयाप्रमाणे आमच्यात असा मिसळून जातो की नेहमी वाटतं हा आपल्याच वयातला एक आपला मित्र आहे. डॉ.हर्षदीप सर कुठलंही काम सांगताना त्या कामाचं महत्व, त्या कामाची जबाबदारी आणि त्या कामातली अपेक्षा अगदी शिक्षकाने विद्यार्थ्याला समजून सांगावी तसं समजावून सांगतात. आपल्या टीम वर विश्वास ठेवून काम करताना आणि काम करवून घेताना सुद्धा मी त्यांना पाहिलंय. आपल्या समाजाचं आपण देणं लागतो याच कारणास्तव आपल्या शासकीय कामाचा व्याप सांभाळून उर्वरित वेळ ते समाजासाठी खर्ची घालतात. तन-मन-धनाने स्वतः ला सामाजिक कार्यात वाहून दिलेल्या या व्यक्तीला बघून त्यांच्यासारखं बनण्याची आम्हा प्रत्येक युवकाला इच्छा होते.
युवकांशी संवाद साधताना त्यांना तासनतास बोलताना आम्ही बघत आलोय. न थकता ते चार ते पाच तास आरामात बोलतात. २४ तासांतून १६ ते १८ तास सलग काम करताना सुद्धा आम्ही त्यांना पाहतो आहोत. सरांच्या युवा विचारांना ऐकून तर कधी कधी मी थक्क होतो, फेसबुक इन्स्टाग्रामच काय तर टीकटॉक सारखं माध्यम देखील सरांना माहीत आहेत. आजवर मी ही याअगोदर टीकटॉक वापरत नव्हतो पण त्यातली दूरदृष्टी आणि त्याचा योग्य वापर कसा करु शकतो हे देखील या व्यक्तींने मांडलं. म्हणजे बघा ना आजच्या युवकांच्या डोक्याने विचार करणारा हा व्यक्ती वयाने जरी मोठा असला तरी विचारांनी तरुण आहे, अनुभवी आहे, प्रौढ आहे.
जेव्हाही मी सरांशी बोलतो तेव्हा त्यांच्या बोलण्यातून काही ना काही शिकायला मिळतं. सर जेव्हाही कौतुकाची थाप आमच्यावर ठेवतात तेव्हा जबाबदारी वाढल्याचं भान आम्हाला येत राहतं.
आज वयाच्या पन्नाशी ला काबीज केलेला हा योद्धा त्याच्या आचरणाने, विचाराने चिरतरुण असल्याचं बघून त्यांना आपलं आदर्श म्हणून बघण्यात क्षणभर सुद्धा वेळ लागत नाही.
सर,
आज तुम्ही वयाची पन्नाशी गाठली आहे. पण आजही तुम्ही मला माझ्याच वयाचे माझे मित्र म्हणून डोळ्यांसमोर उभं राहता. माझ्याच वयातल्या तरुणासारखा धडपडणारा व्यक्ती म्हणून वारंवार तुम्ही नजरेसमोर दिसतात. आज माझ्यासारखे हजारो युवक तुम्हाला एक रोल मॉडेल म्हणून बघत आहेत. तुमच्यातलं हे विचारांचं आणि आचरणाचं तारुण्य अधिक बहरत राहील यात शंकाच नाहीये आणि हेच तुमचं व्यक्तिमत्व माझ्यासारख्या हजारो युवकांना आपलं आयुष्य घडविण्यात मदत करेल.
सर आज तुमचा वाढदिवस आम्ही सगळेच एक शक्ती देणारा दिवस, एक ऊर्जा देणारा दिवस म्हणून साजरा करतो आहोत. तुमच्यातली अतिसामान्य ऊर्जा आम्हला जगायला आणि घडायला शिकवतेय. तुमचं आयुष्य अधिक फुलत जावो आणि आमचा हा एक युवा योद्धा आपल्या निरोगी आयुष्याची शिडी अगदी हर्षोल्हासात पार करत राहो अशी तथागत चरणी सदिच्छा व्यक्त करतो..
आज माझ्यातर्फे
"पन्नास वर्षाच्या "युवकाला" जन्मदिवसाच्या गणित शुभेच्छा"
"हॅप्पी बर्थडे डॉ हर्षदीप कांबळे सर"
जय भीम , नमो बुद्धाय!!
- शेखर निकम
औरंगाबाद
No comments:
Post a Comment