राजकीय व्यक्तींचा खरा शिलेदार हा सर्व सामान्य नागरिक असतो त्याच शिलेदारला आपल्या वर्षपूर्तीच्या कार्याचा लेखाजोखा विमोचित करण्याचा मान खासदार हेमंत पाटील यांनी दिला आहे. 23 मे 2019 रोजी देशात 16व्या लोकसभेसाठी निवडणूक होऊन निकाल हाती आले.हिंगोली लोकसभा मतदार संघात मात्र इतिहास घडला होता.2 लाख 77 हजार मताधिक्याने खासदार हेमंत पाटील निवडणूक जिंकले आणि जवळपास 18 लक्ष जनतेचे खासदार म्हणून हिंगोली मतदार संघाची धुरा पेलण्यास सज्ज झाले ते आगामी पाच वर्षाच्या सर्वांगिण विकासासाठी, याच पंचवार्षिक कालखंडातील वर्षपूर्ती आज पूर्ण होत आहे . एक वर्षाच्या कालखंडाची सुरवातच शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून करण्यात आली. आणि ही प्रश्न मालिका सुरू झाली तब्बल 95 प्रश्न संसदेत मांडून 10 वेळा चर्चेत सहभाग नोंदविला ,हिंगोली जिल्ह्यासाठी 124 कोटींचा पीकविमा मंजूर केला, हिंगोली साठी स्वतंत्र एफ एम केंद्र,आयुष्य रुग्णालय, अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या शेतकरयांना नुकसान भरपाईची मागणी,कोट्यवधींची विकासकामांना सुरवात,हिंगोली मध्ये हळद प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी वाणिज्य समितीपुढे शिफारस,मतदार संघातील 11 तालुक्यात दिव्यांग बांधवांची नोंदणी ,तपासणी करून साहित्य वाटप ,कोरोनाच्या लढाईत संपूर्ण मतदार संघाचा दौरा करून गरजूंना धान्य किटचे वाटप केले तर कोरोना मध्ये योगदान देणाऱ्या डॉक्टर,नर्स,पोलीस,प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर चे वाटप करून ते करत असलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शेती आणि शेतकरी हा जिव्हाळ्याच्या विषय असल्याने याबाबत सदैव झुकते माप देऊन वेळोवेळी शेतकरी प्रश्नाबाबत आवाज बुलंद केला.कापूस, मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र व राज्यस्तरावर विशेष प्रयत्न करून मंजूर केले तर विशेष कापणी अहवालासाठी प्रसंगी शासननिर्णयात बदल करायला लावला.शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बी-बियाणे खते उपलब्ध करून देण्याची मागणी ,केली .सर्व सामान्य जनतेच्या प्रश्न स्थानिक स्तरावर सुटावेत यासाठी 6 विधानसभा क्षेत्रात जनसंपर्क अधिकारी नेमून जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात आले.किनवट ,बाळापूर,भागात आलेल्या भूकंप परिस्थिती मध्ये सदैव सोबत राहून जनतेचे मनोबल वाढविले ,प्रसंगी गरजूंना शिवभोजन थाळीचा आधार देऊन सामाजिक ऋण व्यक्त केले.यामुळे मागील वर्षभर जनतेसाठी कार्य करताना मनातून समर्पण भावना व्यक्त होत राहिली, असे खासदार हेमंत पाटील म्हणाले.आगामी काळात सुद्धा जनतेसाठी कार्य करण्याची ऊर्जा मिळत जावी.जेणेकरून पुढील काळात महिला ,तरुण यांच्या साठी कार्य करता येईल आणि हिंगोली मतदार संघ उद्योग क्षेत्रात मजबूत होईल लक्ष देऊन कार्य करायचे आहे, असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.

No comments:
Post a Comment