किनवट,दि.१ : शनिवारपेठ-दाभाडी(ता.किनवट) दरम्यान गायरानातील सागवान वृक्षाची मालकीपट्याच्या नावाखाली कांही लाकूड व्यावसायीकांनी वनविभागातील कर्मचा-यांच्या संगनमतातून प्रचंड तोड केली आहे. वृक्षप्रेमींनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यास बोधडी वनविभागाने आता शेतक-यांना लक्ष करुन वृक्षतोड कांडातून अलिप्त होऊ पहात आहेत. या वृक्षतोडीत लाकूडमाफीया आणि वनविभाग हेच जबाबदार असून त्यांच्या विरुद्ध ःविनाविलंब कार्यवाही करण्याची मागणी पत्रकाद्वारे केली आहे.
बोधडी वनविभागाच्या हद्दितील शनिवारपेठ-दाभाडी शिवारातून शेत गट क्र.११५ हा एका लहान नाल्याच्या दुतर्फा असून तो नाला पुढे मोठ्या नाल्याला जोडला गेला. बेंदी सज्जाकडे गेला आहे. याच परिसरात अधून-मधून मालकीपट्याची सबब पुढे करुन या नैसर्गीक जंगलातील मोठमोठी सागवान वृक्षांची कत्तल करुन वाळवंट होऊ घालण्याच्या मार्गावर आहे.
No comments:
Post a Comment