लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी जाण्यास कार्यप्रणाली निश्चित जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आदेश निर्गमीत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 1 May 2020

लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी जाण्यास कार्यप्रणाली निश्चित जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आदेश निर्गमीत

नांदेड, दि. 1 :- लॉकडाऊनच्या कालावधीत विविध राज्यात, जिल्ह्यात अडकलेले विस्थापित कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना नांदेड जिल्ह्यात येण्यासाठी व नांदेड जिल्ह्यातील लोकांना त्यांच्या संबंधित राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जाण्याकरिता आवश्यक असणारी परवानगी देण्यासाठी संबंधीत जिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून प्राधिकृत केले आहे.

नांदेड जिल्ह्यातून राज्यांतर्गत, परराज्यात वरीलप्रमाणे नमूद लोकांना जाण्यासाठी करावयाची कार्यप्रणाली पुढील प्रमाणे राहील.

संबंधित तहसिलदार हे तहसिल स्तरावर अशा लोकांची यादी तयार करतील. यादीनुसार तालुका स्तरावरील कॅम्प किंवा रवानगीच्या ठिकाणी अशा सर्वांची थर्मल व वैद्यकिय तपासणी करुन त्याबाबतचे संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात यावे. या तपासणीत कोरोना रोगाचे लक्षणे नसलेल्या व्यक्तिंची यादी ते ज्या राज्यातील आहेत त्या राज्य, जिल्हा, तालुका, गाव या पद्धतीने तयार करण्यात यावी. प्रवासासाठी पात्र व्यक्तिंची यादी जिल्हाधिकारी कार्यालयातील समन्वय अधिकारी तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे सादर करावी. अशा याद्या तहसिलदार यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर व्यक्ती ज्या राज्यात जात आहेत त्या व्यक्तिच्या रहिवास पर्यंतचा रुट प्लॅन तयार करण्यात यावा. त्यानंतर ही यादी जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीसाठी सादर करावी. यादीस मान्यता प्राप्त झाल्यानंतर संबंधीत सक्षम प्राधिकारी / जिल्हाधिकारी यांना ते सादर करुन त्यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर अशा व्यक्तिंना प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाची निर्जतूकिकरण करुन रवानगीची कार्यवाही त्या-त्या ठिकाणावरुन करावी. वाहनासोबत प्रवाशांची यादी, वैद्यकीय प्रमाणपत्र, वाहन पास, रुट प्लॅन, संबंधीत प्रवाशांचे हमी प्रमाणत्र ठेवावे.

नांदेड जिल्ह्यात राज्यांतर्गत / पराज्यातून येणाऱ्या लोकांना नांदेड जिल्ह्यात येण्यास परवानगीबाबची कार्यवाही राज्यांतर्गत / परराज्यातून नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तिंची संबंधीत नोडल अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त होणारी यादी / जोडपत्र “ब” मधील परवानगी वैद्यकीय प्रमाणपत्र, रुटप्लॅन, वाहनाची परवानगी, वाहनाचे प्रकार, प्रवासाचा कालावधी इत्यादी पत्रासह माहिती प्राप्त झाल्यानंतर अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यास समन्वय अधिकारी तहसलिदार संगायो श्रीमती वैशाली पाटील, डॉ. मृणाल जाधव, डॉ. संजय बिराजदार यांनी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर संबंधितांना परवानगीचे पत्र पाठवावे. अशी प्राप्त संबंधीत तहसिलदार यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवावी.

याप्रमाणे येणाऱ्या व्यक्तिंची नांदेड जिल्ह्यात प्रवेशाच्या ठिकाणी वैद्यकिय पथक गठित करण्यात यावे. ज्यामध्ये पोलीस, महसूल व वैद्यकिय अधिकारी यांचा समावेश असावा. या पथकामार्फत आलेल्या प्रत्येक व्यक्तिंची थर्मल गनद्वारे व इतर अनुषंगिक तपासणी करुन तपासणीअंती आवश्यकतेनुसार होम क्वारंटाईन किंवा आ यशोलेशन क्वारंटाईन करण्याची कार्यवाही करावी. ज्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे अशा व्यक्तिंची पुढील 14 दिवसांसाठी शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिक, नगरपंचायत हे पाहतील तर ग्रामीण भागात संबंधीत ग्रामसेवक हे पाहतील.

वरीलप्रमाणे सर्व संबंधीत तहसिलदार यांनी अपर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या सनियंत्रणेत वेळेत जबाबदारी पार पाडावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, समूह यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी  निर्गमीत केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages