क्रांतीसूर्य परिवाराच्या वतीने ऑनलाइन बुद्ध महोत्सव साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 17 May 2020

क्रांतीसूर्य परिवाराच्या वतीने ऑनलाइन बुद्ध महोत्सव साजरा



 किनवट*, : विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती क्रांतीसूर्य व्हाट्सअप समूहात ऑनलाइन नुकतीच साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड येथील ज्येष्ठ  साहित्यिक तथा शहीद जनार्दन मावडे यांचे क्रांतीपुत्र इंजि. डॉ. विवेक मवाडे हे होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानंतर फुले-आंबेडकरी अभ्यासक प्राचार्य केतन सोनपिंपरे (नागपूर), बुद्ध धम्माचे अभ्यासक मिलिंद सोनाळे (किनवट), बुद्ध आणि त्याचा धम्माचे अभ्यासक शांतिदूत मुळे (घाटंजी), फुले-आंबेडकरी व्याख्याते प्रा. डॉ. पंजाब शेरे (किनवट), मायाताई बिराडे (नांदेड) व सत्यभामा भगत (किनवट) यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्तंभलेखक उत्तम कानिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे रमेश मुनेश्वर यांनी केले, तर आभार सांगावाकर महेंद्र नरवाडे यांनी मानले.

लॉकडाऊनच्या काळात घर घर बुद्ध जयंती साजरी करूया या उपक्रमांतर्गत क्रांतीसूर्य परिवाराने 'बुद्ध महोत्सव' आयोजित केला होता तीन सत्रात घेतलेल्या या बुद्ध महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला.

'बुद्ध पहाट' या पहिल्या सत्रात  धम्मपद मॉनेस्ट्री, पारनेर येथील  भंते दीपरत्न यांच्या वंदनेने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर यवतमाळ येथील प्रसिद्ध गायक गौतम पाढेन यांनी बहारदार गीते सादर करून वाहवा मिळवली,तर महाकवी वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील त्यांच्या सुगम गीतांनी टाळ्या मिळविल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी गायक रुपेश मुनेश्वर यांनी केले, तर आभार माहूर येथील शेषेराव पाटील यांनी मानले.

दुपारच्या 'धम्म कविसंमेलनात' प्रा. डॉ. अंबादास कांबळे (किनवट), रमेश बुरबुरे (यवतमाळ), चंद्रकांत कदम (नांदेड), प्रा. सुभाष गडलिंग (अमरावती), प्रितम देवतळे (घाटंजी) व सुरेश शेंडे (किंनवट) यांनी उत्तमोत्तम रचना सादर करून बुद्ध विचारांचा जागर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतकार महेंद्र नरवाडे यांनी केले तर आभार कवी राजा तामगाडगे यांनी मानले.

कार्यक्रमास नायब तहासीलदार सर्वेश मेश्राम, अशोक निमसरकर, अॅड. मिलिंद सर्पे, प्रा.डॉ. आनंद भालेराव, माधव सर्पे, अभि. सचिन गिम्मेकार, प्रा.सुबोध सर्पे, राजू कांबळे, भारतध्वज सर्पे,  अनिल गिम्मेकार,  परमेश्वर सुर्वे, जयपाल भालेराव, अनिल भवरे, प्रा. धनराज हलवले, भिमशाहिर चंद्रकांत धोटे, सोमा पाटील, दिलीप कावळे, विजय भगत, दिलीप भगत, मोहन भवरे, प्रा.अजय पाटील, प्रमोद तामगाडगे, अनिल उमरे, माधव नगारे, सुजाता पोपलवार, कुसुम भवरे, करुणा पवार, प्रीती भवरे, यांच्यासह समूहातील सर्व सभासद ऑनलाईन उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages