वैयक्तीक लाभाच्या सिंचन विहीरीस मुदतवाढ द्या-आमदार भीमराव केराम यांची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 24 May 2020

वैयक्तीक लाभाच्या सिंचन विहीरीस मुदतवाढ द्या-आमदार भीमराव केराम यांची मागणी

किनवट, : कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत वैयक्तीक लाभाच्या सिंचन विहीरींची कामे पुर्णत्वास न गेल्यामुळे उर्वरीत खोदकाम व बांधकाम पुर्ण करण्यासाठी या कामांना मुदतवाढ देण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी कृषी व सैनिक कल्याण मंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे नुकतीच केली आहे.
    कृषी व सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केलेल्या मागणीपत्रात आ. केराम यांनी नमूद केले आहे की, देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर असलेला लॉकडाऊन व संचार बंदी तथा जमावबंदीमुळे सन २०१९-२० या वर्षात राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत सिंचन विहीर लाभार्थी शेतक-यांना मार्च अखेरपर्यंत कामे पुर्णत्वास नेता आले नाही. त्याउपर पावसाळाही समोर येवून ठेपल्यामुळे सिंचन विहीरींचे राहीलेली कामे पुर्णत्वास नेण्यास शेतकरी लाभार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सिंचन विहीरींच्या अपुर्ण कामांना पुर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळणे गरजेचे आहे,असे पत्रात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Pages