दारुच्या नशेत पतीने केली पत्नीची व मुलांची क्रुर हत्या - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 27 May 2020

दारुच्या नशेत पतीने केली पत्नीची व मुलांची क्रुर हत्या

मुखेड : तालुक्यातील मंडलापूर येथे पतीने सासरवाडीला येऊन पत्नी व एक  वर्षाच्या  मुलाची गळयावर चाकुने वार करुन क्रुर हत्या केल्याची घटना दि. २७ मे २०२० रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली.
   तानाजी भुताळे (वय ३० अंदाजे) हा येडुर (ता. औराद जि. बिदर) येथील असून तो मंडलापूर येथे सारवाडीला आला असता त्याच्या पत्नीस गावी येण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला. दि. २७ रोजी दारुच्या नशेत मुखेड – देगलुर रोडवर असलेल्या मंडलापूर येथे शिवारात पत्नीच्या राहत्या घरी रागात येऊन पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची गळयावर चाकुने वार करुन क्रुर हत्या केली असल्याचे गावातील नागरीकांनी सांगितले.

आरोपी पळुन जात असताना गावातील नागरीकांनी त्यास पकडुन झाडाला बांधुन ठेवले व पोलिसांना माहिती दिली. घटना कळताच पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगर हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. सदर घटना कळताच आजुबाजुच्या गावातील नागरीकांनी एकच गर्दी केली.

मयत वैशाली तानाजी भुताळे( वय २५ अंदाजे ) व मुलगा आदेश तानाजी भुताळे (वय ०१ वर्ष) यांच्या क्रुर हत्येने संपुर्ण तालुका हादरला असून आरोपींना कडक शासन व्हावे, अशी गावक-यांतून मागणी होताना दिसुन येत होती.
   दरम्यान, आरोपीस  पोलिसांनी  अटक केली  असून  मयताचे  शवविच्छेदन करण्यासाठी  उपजिल्हा  रुग्णालय  मुखेड  येथे  घेऊन  जाण्याची  प्रकिरया चालू  होती.

No comments:

Post a Comment

Pages