Covid-19 कोरोना ही महामारी संपूर्ण जगात थैमान घालत असतांना कोणताही देश या महामारीपासून सुटला नाही. समस्त विश्व या कोरोना ने ग्रासले आहे. अश्यातच या माहामारीचा सामना करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, धर्मादाय संस्था पुढे आल्या आणि त्यांना जितकं शक्य आहे तितकी मदत गरीब, होतकरु आणि स्थलांतरित मजुरांना केली. अश्यातच एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी डॉ. निलेश भरणे (DIG, Crime नागपूर) या माणसाने आपली कायदा आणि सुव्यवस्थेची सूत्र जबाबदारीने सांभाळत COVID-19 ग्रस्तांना सतत अडीच महीने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता 24 तास गरीब आणि मजुरांच्या सेवेसाठी लढणारा खरा योद्धा आदरणीय भरणे साहेबांच्या कर्तृत्वातून उदयास आला. सामाजिक जाणिवेतला माणसाचा खरा चेहरा आणखी जनतेसमोर आला. मजुरांच्या कॅम्प तयार करणे, त्यांचे जेवण, निवासाची सोय, स्वच्छ पाणी, आरोग्याची काळजी, त्यांच्या मनोरंजनाच्या सोयीसह कुठल्याच गोष्टीची त्यांना चुणूक भासता कामा नये याची काटेकोरपणे जबाबदारी पेलणारे कोविड योद्धे आहात सर तुम्ही. या परिस्थितीत स्थलांतरीत मजुरांच्या समस्या अतिशय जिवघेण्या ठरल्या. एप्रिल-मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात 1500 ते 2000 किलोमिटर पायी रस्ता तुडविनाऱ्या मजुरांच्या पायाला आलेल्या चटक्यांना बघत कोणत्याही भावनारहीत माणसाला त्याच्या अवस्थेची कीव येणार नाही. तो माणूसच नाही..! असा विचार डोळ्यासमोर ठेवत माणूस म्हणून माणसाच्या दुःखाची आणि त्रासाचा गांभीर्यपूर्वक विचार करून नागपुर शहराच्या चारही चेक पोस्टच्या बाजूला जेवण, पाणी आणि नाश्त्याची सोय केली. निवाऱ्याची सोय उपलब्ध करून दिली. इतकेच नाही तर पायी चालणाऱ्या मजुरांच्या पायात चप्पल आणि कपडे उपलब्ध करून दिले. इतर राज्यातील मजुरांची वैद्यकीय चाचणी करून औषधोपचार डॉ. भरणे साहेबांनी करून दिला. खऱ्या अर्थाने अश्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची गरज या देशाला आहे. परप्रांतीय मजुरांची नावाची नोंदणी करणे, त्यांची वैद्यकीय चाचणी करून, त्याच्या शहराची/गावाची तिकीट काढून पहाटे पाच वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत रेल्वेस्थानकावर त्यांच्या जेवणाच्या सोयीसह आपल्या खात्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या पथकासह त्यांची देखभाल करणारा खरे नायक डॉ. भरणे साहेब. शहरातील 150 पेक्षा अधिक सामाजिक संघटना, संस्था, युवा ग्रुप्स, सेवाभावी संस्था यांच्याशी समन्वय साधत गरिबांना, झोपडपट्टी भागात, ग्रामीण भागात धान्य किट, कुठे जेवण, कुठे मॉस्क सॅनिटीझर, कुठे पाणी अश्या प्रकारची जिथे ज्या प्रकारची मदत करणे शक्य होईल तितकी मदत करण्यासाठी 24 तास सतत अडीच महिन्यापासून परिवाराला वेळ न देता या युद्धात झटणारा कोविड योद्धा म्हणून तुमचे नाव अजरामर राहील सर. 24 तासापासून जेवण न करणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांना नागपुरात रेल्वे स्थानकांवर स्वतःच्या हाताने जेवण देणारा पोलीस अधिकारी डोळ्यादेखत पाहिल्यानंतर डॉ. भरणे साहेबां बद्दलचा आदर शंभरगुणीत होतो. गरिबांच्या स्थितीची जाणीव करीत घरी पोहचल्यानंतर 4 दिवसाची चूल पेटावी म्हणून काही पैसे हातात देतात तेव्हा. गरिबांच्या चेहऱ्यावरील अश्रू अनावर होतात. जेव्हा प्रवासी घरी पोहचतात आणि साहेबांना कॉल करून फोनवर रडत-रडत एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचे आभार आणि उपकार मानतात तेव्हा डॉ. भरणे साहेब पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणतात, की मजुरांच्या केलेल्या सोयीचे त्यांच्या भावनेत आभार माणतांना डोळे भरून येतात. आणि गरिबांना केलेल्या मदतीने आयुष्याचे सोने होते. त्यांचा आशीर्वाद आयुष्यात एक वेगळेच समाधान देऊन जाते. याचे मूर्तिमंत उदाहरण नागपूरचे गुन्हे शाखेचे DIG डॉ निलेश भरणे आहेत.
या युद्धकाळातील संपूर्ण कार्याची दखल उच्च न्यायालय घेते आणि न्यायालयाचे न्यायमूर्ती हे डॉ. भरणे साहेबांचे आदराने कौतुक करतात तेव्हा पोलीस विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी साहेबांचा सिंहाचा वाटा ठरला आहे...साहेब आपल्या कार्य कर्तुत्वाला जितका सलाम करावा तितका कमीच. आपले कार्य आणि शैली पोलीस विभागातील अनेकांना अजरामर प्रेरणा देणारी राहील...
बादलराज
9403179484
Thursday, 28 May 2020
Home
प्रासंगिक लेख
कोरोनाविरुद्धच्या युद्धात डॉ निलेश भरणे IPS अडीच महिन्यांपेक्षा जास्त वेळ गरीब, होतकरू, स्थलांतरीत मजुरांसाठी 24 तास वेळ देतात तेव्हा...!
कोरोनाविरुद्धच्या युद्धात डॉ निलेश भरणे IPS अडीच महिन्यांपेक्षा जास्त वेळ गरीब, होतकरू, स्थलांतरीत मजुरांसाठी 24 तास वेळ देतात तेव्हा...!
Tags
# प्रासंगिक लेख
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
प्रासंगिक लेख
Labels:
प्रासंगिक लेख
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.


No comments:
Post a Comment