नांदेड : श्री गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड परिसरात राहणाऱ्या ९७ व्यक्तींचा स्वॅब ता. ३० एप्रिल ते ता. एक मे या कालावधीत घेतला होता. यात वीस रुग्ण कोरोना विषाणुमुळे बाधित असल्याचे आज आढळून आली आहेत. २५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला. तर ११ स्वॅब अनिर्णित आहेत. उर्वरित अहवालाची प्रतीक्षा आहे. या व्यक्तींना एनआरआय भवन कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात विषाणू बाधित झालेल्या गुरुद्वार परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात पुर्वीचे सहा आणि नव्याने वीस रुग्णांचे स्वॅब असे एकूण सवीस पॉझीटिव्ह आहेत.
कोरोना विषाणु संदर्भात शनिवार (ता. दोन) सकाळी नऊ वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात एक हजार २३५ संशयितांची नोंद झाली आहे. यामध्ये जिल्ह्यात कोरोना संशयितांचे घेण्यात आलेले एकूण स्वँब एक हजार १२० असून त्यापैकी एक हजार नऊ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर ६५ स्वँबचा अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत पाच जणांच्या स्वँब तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. तसेच १४ जणांचा निष्कर्ष निघालेला नाही. एकूण घेण्यात आलेले स्वँब एक हजार १२० पैकी आतापर्यंत पूर्वीचे सहा रुग्ण आणि नव्याने आलेले वीस रुग्णाचा स्वँब असे एकूण २६ स्वँब पॉझीटिव्ह आहेत. यापैकी पिरबुऱ्हाणनगर आणि परभणी जिल्ह्यातील सेलू येथील महिला रुग्णाचा औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे मृत्यू झाला आहे.
नांदेड शहरातील अबचलनगर येथील एका रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल रविवार ता. २६ एप्रिल रोजी प्राप्त झाला होता. या रुग्णाची प्रकृती स्थीर आहे तसेच त्याच्या निकटवर्तीय संपर्कातील १८ व्यक्तींचे स्वँब घेण्यात येवून तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी १८ व्यक्तींच्या स्वँब तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे.
श्री गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील भाविकांना पंजाब राज्यापर्यंत वाहन सेवा पुरवणारे दोन वाहन चालक आणि त्यांचा एक मदतनीस यांचाही स्वँब अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाला आहे. हे वाहन चालक आणि मदतनीस गुरुवारी (ता. २३) पंजाब येथे जाऊन मंगळवारी (ता. २८) परत आले असता त्यांना नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्याच्या सिमेवरच अडवून वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे दाखल करण्यात आले होते. या तीन व्यक्तींचे बुधवारी (ता. २९) स्वँब तपासणीसाठी घेण्यात आले होते. सद्यस्थितीत या रुग्णांवर शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
यामधील नांदेड सांगवी येथील रुग्णांचे चार निकटवर्तीय व्यक्तींना यात्री निवास येथील कोविड केअर सेंटर येथे तर लोहा तालुक्यातील किवळा येथील रुग्णांचे नऊ निकटवर्तीय व्यक्तींना कोविड केअर सेंटर लोहा व कंधार तालुका येथे अलगीकरण करण्यात आले असून त्यांची स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.
जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
Saturday 2 May 2020
Home
जिल्हा
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर नको शहरात नव्याने वीस रुग्ण कोरोना बाधित आतापर्यंत 26 रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह ; तर एक हजार नऊ जणाचा अहवाल निगेटिव्ह
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर नको शहरात नव्याने वीस रुग्ण कोरोना बाधित आतापर्यंत 26 रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह ; तर एक हजार नऊ जणाचा अहवाल निगेटिव्ह
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment