किनवट,दि.29 : रोहिणी नक्षत्राच्या कडक उन्हामध्ये सतत विज पुरवठा खंडीत होत असल्याने शहरातील नागरीक त्रस्त झाले आहे.महावितरण ने आपली सेवा तत्काळ सुधारावी व शहरातील विज पुरवठा सुरळीत करावा, अशा आशयाचे निवेदन भाजप शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी भाजप नगरसेवकांच्या उपस्थितीत आज(दि.२८) दिले आहे.
नवतपाच्या असह्य उन्हाच्या चटक्यामध्ये शहरात महावितरण कडुन सतत विज पुरवठा खंडीत होत असल्याने शहरातील नागरीक त्रस्त झाले आहे.शहरातील विज वितरण करणारी यंत्रणा ही जिर्ण झाली आहे. विज पुरवठा करणारे खांब वाकले आहेत. तारां मधील तणाव कमी झाल्याने तारा लोंबकळत आहे. यामुळे नागरीकांना धोका निर्मान होत आहे. अनेक विज खांबा जवळ झाडाच्या फांद्या वाढल्याने थोड्याशा हवेमुळे विज पुरवठा तारांचे घर्षण होत असल्याने बंद होत आहे. विज पुरवठा करणा-या खांबावरील चिनिमातीच्या डिस्क ह्या जुण्या व जिर्ण झाल्याने त्या रात्री बे रात्री फुटत आहे.शहरातील अनेक रोहित्र हे जुने, असुरक्षित तथा नादुरुस्त आहेत. यामुळे उन्हातानात व रात्री बेरात्री विद्युत पुरवठा खंडीत होत आहे.
या वर्षी लॉकडाउन मुळे किनवट शहरालगतच्या दोन कोल्हापुरी बंधा-यामध्ये पाणी अडवण्यात आल्याने शहरातील पाणी पातळी चांगली आहे. नागरीकांच्या बोरवेलला ही पाणी चांगल्या प्रकारे आहे. नगर परिषदेकडुन नळाला देखिल चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु, खंडीत विज पुरवठ्यामुळे सर्व यंत्रणा निकामी होऊन खोळंबा निर्माण होत आहे व शहरात कत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
या परिस्थितीत भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक यांनी संदर्भीय मागण्याचे निवेदन सादर केले आहे. यावेळी त्यांनी उपकार्यकारी अभियंता श्री. परचाके व शहर अभियंता श्री. उईके यांच्याशी चर्चा केली. त्यावर उपरोक्त अधिका-यांनी श्रीनिवास नेम्मानिवार यांना आश्वस्त केले की, शहरातील विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करुन पावसाळ्यापुर्वीची सर्व दुरुस्तीची कामे देखिल आम्ही लवकरात लवकर पुर्ण करु. या विषयी आ.भीमराव केराम यांनी देखिल अनेकवेळा दूरध्वनी वरुन संवाद साधला असून त्यांना ही आम्ही होत असलेल्या नादुरुस्तीची माहिती दिली आहे. आ.भीमराव केराम यांनी देखिल काही तांत्रिक बाबीची आवश्यकता असल्यास ते कळवावे त्यानुसार वरिष्ठ पातळीवरुन आपण पाठपुरावा करु ,असे सांगितले आहे.
निवेदन सादर करतांना भाजप शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांच्यासह नगरसेवक शिवा आंधळे, रिपाइंचे चे तालुका अध्यक्ष विवेक ओंकार, सामाजिक कार्यकर्ते शिवा क्यातमवार, शेख खलिल, गौरव इटकेपेलीवार, नरसिंग तक्कलवार तथा भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Friday, 29 May 2020
विज पुरवठा सुरळीत करावा ;भाजप शहराध्यक्ष श्रीनिवास नेमानीवार यांची मागणी
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment