नगरसेवक व्यंकट नेम्मानिवार यांच्यातर्फे पोलिस व आरोग्य विभागास 'पीपीई', किटचे मोफत वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 29 May 2020

नगरसेवक व्यंकट नेम्मानिवार यांच्यातर्फे पोलिस व आरोग्य विभागास 'पीपीई', किटचे मोफत वाटप

किनवट,दि.२९ : शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक व्यंकट नेम्मानिवार यांनी आरोग्य प्रशासन व पोलिस प्रशासनाला पी.पी.ई. कीट चे आज(ता.२९) मोफत वाटप केले.
       शहरातील कांहीं  सामाजिक कार्यकर्ते वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवतात. हे कार्य त्यांच्या वारसा हक्काने चालत आले आहे. व्यंकट नेम्मानिवार यांचे वडील (स्व.)गोपाळराव नेम्मानिवार हे किनवट चे माजी नगराध्यक्ष होते त्यांवेळी ही त्यांच्या कडुन सामाजिक उपक्रम राबवले जायचे. तोच वारसा पुढे चालवत व्यंकट नेम्मानिवार हे देखिल विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.
       मागील आठवड्यात किनवट पोलिस प्रशासनातर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांनी किनवट व परिसरातील दानशुर व्यक्तींना आवाहन केले होते की, संभाव्य कंटोनमेंट झोन उध्दभवण्याच्या परिस्थिती मध्ये पोलिस प्रशासनाकडे उध्दभवलेल्या परिस्थिती पासून संरक्षणाकरिता व कोरोना विषाणुच्या संसर्गापासुन बचावाकरीत उपयुक्त संसाधने देणे आवश्यक आहे. ती संसाधने दानशुर व्यक्तींनी उपलब्ध करुन द्यावी. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक व्यंकट नेम्मानिवार यांनी पोलिस प्रशासनाला १० व आरोग्य विभागाला १५ असे एकुण २५ पी.पी.ई किट चे वाटप केले.  

    यावेळी पोलिस प्रशासना तर्फे उपविभागिय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांनी पी.पी.ई किट स्विकारल्या. आरोग्य विभागा तर्फे डॉ. धुमाळे यांनी गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालयात पी.पी.ई किट स्विकारल्या यावेळी वेंकट नेम्मानिवार यांच्या सोबत राहुल जाधव व मित्रमंडळ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages