नांदेड दि. 11 :- लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये गोवा गुटखा 30 बोरी अंदाजे 18 लाख 72 हजार किंमतीचा आढळून आला असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून अन्नपदार्थाची कोणीही छुप्या, चोरट्या पद्धतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रक क्र. के. ए. 38- 6482 या वाहनात प्रतिबंधित अन्न पदार्थाची 10 जून रोजी अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी तपासणी केली. यावेळी 1 हजार गोवा गुटखा 30 बोरी जवळपास 18 लाख 72 हजार किंमतीचा आढळून आला. गुलबर्गा (कर्नाटक) जिल्ह्यातील पडसावली (ता. आळंदा) येथील आरोपी रुखमोद्दिन इमाम इमानदार वय वर्षे 28 यांच्या विरुद्ध माळाकोळी पोलीस स्टेशन येथे अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मा. न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितास अजीवन तुरुगंवास आणि 10 लाख रुपयापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड, सुनिल जिंतूरकर व नमुना सहायक अमरसिंग राठोड यांनी केली.
Thursday, 11 June 2020
18 लाख 72 हजार रुपयाचा गुटखा जप्त संबंधितांवर गुन्हा दाखल
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment