दरसांगवी ( चि) येथील विविध कामांची पाहणी करून सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल व राज्य तांत्रिक अधिकारी वैभव कंपावार यांनी व्यक्त केले समाधान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 14 June 2020

दरसांगवी ( चि) येथील विविध कामांची पाहणी करून सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल व राज्य तांत्रिक अधिकारी वैभव कंपावार यांनी व्यक्त केले समाधान

किनवट,दि.१४ : येथून जवळच असलेल्या दरसांगवी ( चि)  येथील मनरेगा व विविध योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल व नरेगा-मनरेगाचे वैभव कंपावार यांनी समाधान व्यक्त केले.
               गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली सारिका आटकोरे-वाकोडे यांनी ग्रामपंचायत दरसांगवी (चिखली ) अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेत पाच लक्ष रुपये निधीतून स्मशानभूमी आरो प्लँट,व चौदाव्या वित्त आयोगातून जनावरांना पाणी पिण्यासाठी होद बांधकाम करणे, शाळा खोली डिजिटल करणे व अंगणवाडी दुरुस्ती करणे,मनरेगाच्या कुशल-अकुशल निधीततील सात लक्ष रुपयातुन सार्वजनिक सिंचन विहिर आणि पेसा निधीतून अंगणवाडी आयएसओ करणे, शाळा रंगरंगोटी करणे व अंगणवाडी तारेचे कुंपन ही कामे केली आहेत.
               सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल यांनी दरसांगवी ( चि) येथे नुकतीच भेट देऊन या कामांची पाहणी केली चांगल्या कामांची प्रशंसा करून त्यांनी मौलिक सूचनाही दिल्या. याप्रसंगी सरपंच देवराव हातमोडे, उपसरपंच सुदाम तरटे, पोलीस पाटील विठ्ठलराव शेलार, सदस्य राजू हातमोडे, अरविंद सूर्यवंशी, माधव चव्हाण, निळकंठ शिंदे आदीजन शारीरिक अंतर ठेवून उपस्थित होते.
             
  *राज्य तांत्रिक अधिकाऱ्यांनी केली मनरेगाच्या कामांची पाहणी*

           राष्ट्रीय रोजगार हमी योजना (नरेगा ) व  महाराष्ट्र रोजगार हमी योजना (मनरेगा ), नागपूरचे राज्य तांत्रिक अधिकारी वैभव कंपावार यांनी दरसांगवी ( चि) येथील मनरेगाअंतर्गत कुशल -अकुशल निधीतून केलेल्या " सिंचन विहीर " या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. सुव्यवस्थितरित्या पूर्णत्वास आलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. यावेळी पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी जी.व्ही. मदने, सचिन येरेकार, ग्रामसेविका सारीका आटकोरे, रोजगार सेवक कैलास वाठोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.  एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळात स्वतंत्रपणे भेटी दिलेल्या या दोन्हीही अधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी यथोचित स्वागत केले.




No comments:

Post a Comment

Pages