
मुंबई,दि, 15 जुन 2020: प्रख्यात दलित साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीतील अग्रणी अर्जुन डांगळे यांचा येत्या 15 जूनला मुंबईत होणारा नियोजित अमृत महोत्सवी सोहळा कोरोनाच्या जागतिक अरिष्टामुळे स्थगित करण्यात आला आहे. अर्जुन डांगळे गौरव समितीचे समन्वयक प्रा. डॉ सुनील अवचार यांनी ही माहिती एका पत्रकाद्वारे दिली आहे.
अर्जुन डांगळे यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली असून त्यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यासाठी गेल्या वर्षी प्रा डॉ जी के डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली एक गौरव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीतर्फे आयोजित गौरव सोहळ्यात डांगळे यांचा एक गौरव ग्रंथही प्रकाशित करण्याची तयारी पूर्ण झाली होती. मात्र हा कार्यक्रम आता स्थगित करण्यात आला असून त्याची पुढील तारीख कोरोनाच्या संकटाचे निवारण झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे.
डांगळे यांच्या अमृत महोत्सवाचा जाहीर वा कौटुंबिक असा कोणताही कार्यक्रम येत्या 15 जूनला होणार नाही, असेही प्रा अवचार यांनी स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment