किनवट,दि.४ : कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमिवर केवीड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन पातळीवरून युध्दपातळीवर उपाय योजना राबवित असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांप्रमाणेच ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदार व तोलाई कामगारांनाही विमा संरक्षण देण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी केली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना नुकत्याच दिलेल्या पत्रात आमदार भीमराव केराम यांनी सदरची मागणी केली आहे.राज्य शासनाने २९ मे २०२० रोजी निर्गमित केलेले शासन निर्णयाचा हवाला देवून त्याच धर्तीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जनतेच्या थेट संपर्कात असलेले ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदार व सहकारी कामगार हे जनतेच्या थेट संपर्कात येत असल्याने त्यांचीही अत्यावश्यक सेवेत गणना करून त्यांना कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंतच्या कालावधीपर्यंत ५० लाखांचे विमा संरक्षण लागू करावे, अशी मागणी लिखित पत्रात केली आहे.
Thursday, 4 June 2020
स्वस्त धान्य दुकानदार व तोलाई कामगारांना विमा संरक्षण लागू करा : आमदार भीमराव केराम
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment