नांदेड: दि 11
वृत्त संकलन करण्यासाठी गेलेले पत्रकार अनिल डोईफोडे यांना पतंग उडविण्याच्या दोरीने गंभीर दुखापत झाल्याने त्यांना आर्थिक मदत करून नुकसानभरपाई देण्याची मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भोकर येथील पत्रकार अनिल डोईफोडे हे वृत्त संकलनासाठी गेले असता अचानक उडत आलेल्या पतंगाच्या मांजाने त्यांचे गाल व हनुवटी कापली गेल्याने बारा टाके पडले असून त्यांचा जीव थोडक्यात बचवला आहे.
सोमवार दिनांक 8 जून रोजी कृषी कार्यालय भोकर येथे वृत्त संकलनासाठी जाऊन आपल्या दुचाकीवरून परत येत असताना गांधी चौकात डोईफोडे यांच्यापुढे अचानक एक पतंग त्यांच्या समोरून उडत आली, त्या पतंगास चायना मांजा असल्याने पत्रकार डोईफोडे यांच्या लक्षात आले नाही, त्यामुळे हा मांजा त्यांच्या चेहऱ्यावर भोवती लपेटला गेल्याने गाल व हनुवटी एका क्षणात कापली गेली, त्यांना तात्काळ काही नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे उपचारासाठी दाखल केले, तिथे त्यांच्या कापलेल्या भागावर टाके मारण्यात आले असून, गाल व हनुवटी वर एकूण बारा टाके पडले आहेत.
सर्वत्र चायना मांजावर विक्रीसाठी बंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात भोकर शहरात चायना मांजा विक्रीसाठी आलाच कसा? असा प्रश्न येथील पत्रकार आणि सामान्य नागरिकाना पडला आहे, चायना मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करावी,व डोईफोडे यांना आर्थिक मदत करून शासनाने नुकसानभरपाई दयावी अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड,जिल्हासचिव शशिकांत गाढे पाटील, दक्षिण विभाग प्रमुख प्रशांत बारादे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Thursday, 11 June 2020
भोकर येथील पत्रकार डोईफोडे यांना नुकसानभरपाई द्या-महेंद्र गायकवाड
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment