मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने किनवट व माहूर येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 16 June 2020

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने किनवट व माहूर येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन

किनवट,दि.१६ : मार्क्सवादि कम्युनिस्ट  पक्षाने मंगळवारी (दि.१६) देशव्यापी निषेध दिनाची हाक दिली होती, त्या अनुषंगाने  किनवट व माहूर तालुक्यात विविध गावात  आज आंदोलने करण्यात आली.
   देशात आधीच बेरोजगारीने विक्राळ रूप धारण केले होते ,त्यात लॉकडाऊनने १५ कोटी कामगारांना बेरोजगार केले आहे. देशातला मोठा जनविभाग उपजीविकेच्या साधनांपासून पूर्णतः वंचित झाला आहे. आपल्या घरांकडे पायी चालत जात असलेल्या मजुरांची काळीज फाडणारी उपासमार पाहून जनतेची काय अन्नान्नदशा झाली आहे, हे दिसत आहे.
   जनतेवर अशी दारूण परिस्थिती लादणाऱ्या सरकारचा आज किनवट व तालुक्यात करोनामुळे लागु करण्यात आलेले नियम काटेकोरपणे पालन करत निषेध करण्यात आला.
या वेळी उपविभागीय अधिकारी कार्यलया समोर निषेध आंदोलन करुन खालील मागण्याचे निवेदन देण्यात आले.
   आज विविध गावांनमध्ये ग्रा.पं.कार्यलयानवर आंदोलन करुन निवदने देण्यात आली. त्यात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या .
इन्कम टॅक्स लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहा महिने दरमहा ७५०० रु. रोख दिले पाहिजेत,सहा महिने दरडोई १० किलो धान्य मोफत पुरवले पाहिजे, मनरेगा अंतर्गत वाढीव मजुरी देऊन किमान २०० दिवस रोजगार पुरवला पाहिजे,शहरी गरिबांसाठीसुद्धा ही योजना लागू करा,बेरोजगारांना ताबडतोबीने बेरोजगार भत्ता जाहीर करा, राष्ट्रीय संपत्तीची लूट, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवा; कामगार कायदे रद्द करायचे धोरण मागे घ्या,
शेतकऱ्यांना तातडीने कर्ज पुरवठा करा,शेतकऱ्यांनाचे माल तात्काळ आॅनलाईन करून खरेदी करा,लाईट बिल,- पैट्रोल -डीजेल दरवाढ मागे घ्या.
   आंदोलन किनवट व  माहूर तालुक्यातील इस्लापूर,  दिपला नाईक तांडा,तोटंबा, चंद्रुनाईक तांडा, मार्लागोंडा,दुर्गानगर, कंचली,शिवनी, सोनवाडी, शिवणी,पांगरी,बुरकलवाडी,जरुर, नागापूर, वाळकी,माहूर तालुक्यात हरडप,साकुर आदि गावात आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व काॅ.अर्जुन आडे ,काॅ.शंकर सिडाम, काॅ.जनार्दन काळे, काॅ.किशोर पवार, काॅ.प्रल्हाद चव्हाण , काॅ.खंडेराव कानडे, काॅ.प्रकाश वानखेडे, काॅ.स्टॅलिन आडे ,काॅ.तानाजी राठोड, काॅ.इंदल राठोड,काॅ.अडेलु बोनगीर ,काॅ.मनोज सल्लागार, काॅ.प्रदीप जाधव, काॅ.टिकाराम राठोड, काॅ.अंबरसीग चव्हाण आदिनी केले.

No comments:

Post a Comment

Pages