किनवट,दि.५ : गोकुंदा (ता.किनवट) येथील महात्मा जोतीबा फुले कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले समाजशास्त्र विषयाचे प्रा.डाॅ. हेमंत सोनकांबळे यांचीकनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून नुकत्याच झालेल्या वेबिनार द्वारे आयोजित बैठकीमध्ये सर्वांनुमते निवड करण्यात आली.
राज्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे ; राज्याध्यक्ष-प्रा.डाॅ. प्रकाश खेत्री, उपाध्यक्ष -डाॅ. श्रीकांत पारखी, सचिव-प्रा.डाॅ. हेमंत सोनकांबळे, सहसचिव-डाॅ. आयवान जाॅन,कोषाध्यक्ष-डाॅ.व्यंकटेश खरात,कार्याध्यक्ष - प्रा.सुनिल शिंदे, सदस्य म्हणून महाराष्ट्रातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातून प्रत्येकी दोन प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले आहेत. या परिषदेचा मुख्य हेतू समाजशास्त्र विषयाची आवड निर्माण करणे, अध्ययन -अध्यापन ,संशोधन गतिमान, संशोधन वृत्ती अध्यापकात निर्माण करणे, समकालीन प्रश्नांची चर्चा घडवून आणणे, दरवर्षी अधिवेशन भरविणे आदी.कार्य केले जाणार आहे.

No comments:
Post a Comment