किनवट, दि.५ : गोकुंदा येथील जेष्ठ नागरिक तुळसाबाई किशनराव गडलिंग (वय ७४)यांचे गुरुवारी (दि.४) रात्री सव्वा नऊच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुलगे,एक मुलगी,सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि.५)सकाळी साडे अकरा वाजता गोकुंदा येथील पैनगंगा तिच्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथील पाली विषयाचे प्राध्यापक व साहित्यिक सुभाष गडलिंग यांच्या त्या आई होत.

No comments:
Post a Comment