किनवट :कोरोना महामारीमुळे जगातल्या तमाम इंडस्ट्रीज बंद पडलेल्या असताना संपूर्ण जगाला जगविणाऱ्या पोशिंद्याला अतिवृष्टी अनुदान भरपाईची संपूर्ण रक्कम विनाविलंब व त्वरीत वाटप करा असे निर्देश शेतकऱ्यांचे कैवारी खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयास दिले आहेत
शेतकऱ्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या अडचणींकडे लक्ष देऊन त्या सोडविण्यास प्राधान्य देणाऱ्या खासदार हेमंत पाटील यांच्या लक्षात आले की ऑक्टोबर १९ मध्ये हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर जमिनीवरील पीके नेस्तनाबूत होऊन बळीराजाच्या तोंडचा घास हिरावल्या गेला होता.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवाल दिल झाला होता अस्मानी संकटाने हैराण झालेल्या शेतकऱ्याला शासनाच्या सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे .या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी सुरुवातीपासूनच लक्ष दिले. परिणामी हिंगोली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळाले तसेच पीक विमाही मिळाला नाही. अनुदान व पीकविमा रक्कमेच्या आधारावरच शेतकरी आपल्या पुढील हंगामाची पेरणी करत असतो अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे शेतीचे नुकसान झाल्यास शेतकरी हैराण होतात. जिल्ह्यातील शेतकऱ्याला हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली होती . त्यानंतर निधीच्या कमतरतेमुळे काही शेतकरी अद्याप वंचित राहिले होते. त्यासाठी खासदार साहेबांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. लवकरच उर्वरित सर्व शेतकरी बांधवांना अतिवृष्टी अनुदान व पीक विमा मिळावा यासाठी हिंगोली , नांदेड व यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्याना निर्देश दिले आहेत .
Thursday, 4 June 2020
अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान त्वरित वाटप करावे- खासदार हेमंत पाटील
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment