किनवट, : कोरोना विषाणु महामारीमुळे मानवी जिवन पटरी वरुन उतरले असून किमान एक वर्ष तरी सर्व व्यवहार सुरळीत होण्याकरीता लागतील, असा अंदाज आहे. परंतु, अशा कठीन काळात एकमेकांना सहकार्य करुन आपणास पुढे जायचे आहे व आलेले संकट परतवून लावायचे आहे. याच अनुषंगाने मुलांचे शैक्षणिक सत्र अजुन सुरु करण्यास शासनाने परवानगी दिलेली नसतांना देखिल काही शाळांनी मुलांचे प्रवेश सुरु केले आहेत. प्रवेशांच्या नावावर हजारो लाखो रुपये डोनेशन व वार्षीक फी च्या नावावर पालकांकडुन उकळणे चालु आहे. यामुळे विद्यार्थ्याचे पालक हैरान असून कोरोनाच्या बिकट काळात अमानविय कॄत्य शैक्षणिक संस्था कडून केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.या शैक्षणिक संस्थांना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे किनवट तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे, तर शैक्षणिक संस्थानां चेतावणी दिली आहे.
देशात व राज्यात २१ मार्च पासुन लॉकडाउन घोषित करण्यात आला आणी तो काळ व त्या नंतर चे दोन महिणे हे विद्यार्थ्यांकरीता अत्यावश्यक असतात कारण या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा व त्यांचे निकाल घोषित करण्यात येतात व पाठ्यक्रम पुर्ण करण्यात येतो. परंतु, लॉकडाउन मुळे विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द झाल्या, शैक्षणिक नुकसान झाले, तथा विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही, यामुळे देखिल दुहेरी नुकसान सहन करणा-या पालकांना मागील वर्षीच्या चार महिण्याच्या फिसचे पैसे परत करुन शैक्षणिक संस्थानी दिलासा द्यावा, अशी मागणी प्रकाश राठोड यांनी केली आहे. येत्यावर्षी च्या शैक्षनिक सत्राकरीता खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या प्रवेशावेळी डोनेशन, प्रवेश फी माफ करावी कारण वर्षानु वर्षे लाखो रुपये या खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांकडुन कमावले आहे त्यांनी अशा संकटाच्या समयी पालकांची साथ द्यावी, अशी अपेक्षा ही श्री.राठोड यांनी व्यक्त केली आहे.
ज्या पालकांना खाजगी शाळा व महाविद्यालय तथा इंग्रजी माध्यमांच्या शाळा पैशा करीता त्रास देतील व प्रवेश नाकारतील त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडे व तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्याशी संपर्क साधावा आम्ही नक्की या बाबत पालकांचे समाधान करु, असे ही त्यांनी यावेळी सांगितले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष हा सदैव नागरीकांच्या सहाय्या करीता अग्रेसर असून किनवट माहूर मतदारसंघात माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वात देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम करत आहे. त्यामुळे कोरोनांच्या संकट समयी नागरीकांनी काळजी करु नये संयमाने आलेल्या संकटांना परतवुन लावावे, असे ही आवाहन प्रकाश राठोड यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment