किनवट, : कर्जबाजारीपणाला कंटाळून अंदबोरी(ता.किनवट) येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी(दि.१२) घडली.याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून आत्महत्येची नोंद केली आहे.
व्यंकटी गणपत चोपडे(वय४८) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.अंदबोरी येथे त्यांना चार एकर शेती आहे.दरम्यान मागील दोन-तीन वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील उत्पन्न पदरात पडले नाही.सततच्या नापीकीमुळे दरवर्षी कर्ज घेऊन शेती पिकविण्याची वेळ येत असल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत व्यंकटी चोपडे यांनी त्यांच्या राहते घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती कळताच किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाचा पंचनामा केला व बोधडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहावर शवविच्छेदन केले. मयत व्यंकटी चोपडे यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली व पत्नी असा परिवार आहे.
Saturday, 13 June 2020
कर्जकसे फेडावे या चिंतेने एका शेतकऱ्याने केली आत्महत्या
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment