शुध्द पर्यावरणासाठी आनंदवन घनवन योजना मियावाकी पध्दतीने वृक्षारोपण करणे गरजेचे ; न्यायाधीश जहांगिर पठाण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 13 July 2020

शुध्द पर्यावरणासाठी आनंदवन घनवन योजना मियावाकी पध्दतीने वृक्षारोपण करणे गरजेचे ; न्यायाधीश जहांगिर पठाण


किनवट,दि.१३ : प्रदूषणावर मात करण्यासाठी घनदाट वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे अत्यंत गरजेचे आहे. सजीवसृष्टीच्या साखळीत वृक्षारोपणाला अनन्य साधारण महत्व असून यामुळे प्रदूषणमुक्त वातावरण होते, पर्यावरण अबाधित रहाते. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याची नितांत आवश्यकता आहे. याकरीता आनंदवन घनवन योजना मियावाकी पध्दतीने वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन  न्यायाधीश जहांगिर पठाण यांनी आज(दि.१३) केले.
       वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान-२०२० अंतर्गत ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अनुषंगाने आनंदवन घनवन योजना मियावाकी मिशन अंतर्गत किनवट न्यायालय प्रांगणात न्यायाधीश जे.आर. पठाण, सहन्यायाधिश जे.एन.जाधव यांचे हस्ते घनवन वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते.
        याप्रसंगी कडूनिंब, पिंपळ, वड, आंबा, कवट आदी रोपवृक्षांची मियावाकी पध्दतीने लागवड करण्यात आली. यावेळी वकील संघाचे सचिव अॅड.दिलीप काळे, अॅड.विजय  चाडावार, अॅड. अनंत वैद्य, अॅड. एस.डी. राठोड, अॅड. काझी, अॅड. दराडे , इतर वकील, सरकारी अभियोक्ता, न्यायालयीन कर्मचारी व संबंधीत पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages