माजी मंञी तथा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा श्रीमती रजनी ताई सातव यांच्या वाढदिवसा निमित्त आज दि.14 जुलै 2020 रोजी हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा व भाटेगाव या ठिकाणी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अरसेनिक आल्बम-३० या औषधीचे मोफत वाटप सोशियल डिस्टनसिंग चे पालन करून हिंगोली जिल्हा युवक काँग्रेस चे सचिव तुषार पंडित यांच्या वतीने करण्यात आले
या वेळी रा.कॉ युवा जिल्हाउपाध्यक्ष रमेश अडकिणे , अमोल सोनटक्के , रतन पंडित , आनंद पंडित , लखन पंडित ,गोमाजी पंडित, संतोष कांबळे यांची उपस्थिती होती
कोरोना च्या कठीण प्रसंगात तुषार पंडित यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कार्याचा नक्कीच जणतेला या औषधाचा लाभ होणार आहे.. व या कार्याचे डोंगरकडा व भाटेगाव परिसरात कौतूक होतांना दिसत आहे..
No comments:
Post a Comment