महाराष्ट्राच्या माळरानावर नंदनवन फुलविन्यासाठी आपली कारकीर्द पणास लावणारे व्यक्तिमत्व स्व.डॉ.शंकरराव भाऊराव चव्हाण साहेब...... प्रसेनजीत केरबा वाघमारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 14 July 2020

महाराष्ट्राच्या माळरानावर नंदनवन फुलविन्यासाठी आपली कारकीर्द पणास लावणारे व्यक्तिमत्व स्व.डॉ.शंकरराव भाऊराव चव्हाण साहेब...... प्रसेनजीत केरबा वाघमारे

 सर्वात प्रदीर्घ काळ म्हणजे सुमारे तीन तपे मंत्री पदावर असणारे आणि पाटबंधारे मंत्री,कृषीमंत्री,मुख्यमंत्री,अर्थमंत्री,संरक्षणमंत्री.गृहमंत्री.अशी महत्त्वाची पदे सांभाळूनही सार्वजिक जीवनात सदैव निष्कलंक राहिलेले शंकरराव भाऊराव चव्हाण यांचा जन्म 14 जुलै 1920 या दिवशी ता.पैठण (जि.औरंगाबाद ) येथे झाला.  हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. विद्यार्थी दशेतच हैदराबाद संस्थानातील विद्यार्थी चळवळीत सक्रिय भाग घेतला. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या निकटच्या तरुण अनुयाया पैकी ते एक होते.न

                      सन 1960 मध्ये महाराष्ट्रा राज्याची निर्मिती झाली आणि स्वतंत्र्य महाराष्ट्र राज्य स्थापन झाले.शंकरराव चव्हाण साहेब या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे विभागाचे कॅबिनेट मंत्री झाले. शेती आणि पाणी साहेबांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय, त्यासाठी ते सगळ्यांशी पोटतिडकीने  भांडायचे .
'शेती करायचं म्हटलं ,की त्याला व्यवस्थित पाणी मिळायला हवं पुरेसं पाणी नसताना शेती करणं म्हणजे निव्वळ जुगार'. हे शब्द.. साहेबांचे घेण्यासारखे आहेत. 
अगदी मनापासून काम करण्यासाठी मनासारखे मंत्रिपद खाते मिळाल्याने साहेब खूप खुश होते.या पदाचा महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेण्याची त्यांची इच्छा होती . आपल्या कारकिर्दीत पाणी शेतीच्या दृष्टीने अवघ्या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचे त्यांचे स्वप्न होते, या स्वप्नपूर्तीच्या पलीकडे त्यांची झेप होती.. जलसिंचन व पाटबंधारे हे विषय  साहेबाच्या नुसतेच आवडीचे नव्हते तर त्या विषयावर त्यांचा अभ्यासही दांडगा होता .सन 1960 मध्ये महाराष्ट्राचे पहिले पाटबंधारे मंत्री म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात पाटबंधारे योजना कशी राबविता येईल ,किती धरणे बांधायची, कुठे बांधायची ,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लाऊन अधिकाधिक जमीन कशी ओलिताखाली राह ल ,याची शेती पाटबंधारे खात्यातील ज्येष्ठ तज्ञांशी चर्चा सल्लामसलत करून संपूर्ण महाराष्ट्रातील जलसंचय योजनेचा आराखडा तयार केला.
याच आराखड्यावर महाराष्ट्र विकासाचा पाया त्यांना रोवायचा होता.आपल्या पहिल्या कारकिर्दीत साहेबांनी महाराष्ट्राचा कायापालट करणारा मराठवाड्यात समृद्ध असणाऱ्या जायकवाडी,या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली औरंगाबाद येथील पैठण मध्ये महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन प्रधानमंत्री श्री.लालबहादूर शास्त्री यांनी ,तर लोकार्पण तत्कालीन  प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी केले. या प्रकल्पांतर्गत सात लाख एकर जमीन ओलिताखाली आली.आता या धरणाचे पाणी मराठवाड्यातील औरंगाबाद ,बीड ,परभणी ,नांदेड या जिल्ह्यांना तसेच आजूबाजूच्या परिसराला मोठ्या प्रमाणात मिळते, त्यामुळे येथील शेतकरी आज बारमाही पीक घेतात.सामान्य नागरिकांचा पाणी प्रश्न मार्गी लागल्या मुळे  आज सुद्धा चव्हाण साहेबांबदल मराठवाड्यातील जनतेच्या मनात लोकनेता अशी त्यांची प्रतिमा आहे .

        महाराष्ट्राचा विकास साधायचा तर जलसिंचन, पाटबंधारे, कालवे ,धरणे बांधून हरितक्रांती केल्याशिवाय विकास शक्य नाही हे साहेब जाणून होते .
या कामातही त्यांचा अभ्यास होता,स्वतःचे गणित होते.धरणे बांधायची तर शास्त्रीय पद्धतीनेच. या तत्वावर त्यांचा विश्वास होता. महाराष्ट्राला जीवदान देणारी धरणे आग्रहपूर्वक मंजूर करण्यात साहेबांना यश आले. त्यात कोयना जायकवाडी,तसेच नगर ,नाशिक, विदर्भाच्या,भागातील धरणांचा प्रामुख्याने समावेश होता.
 आशिया खंडातील ,पहिला तसेच सर्वात मोठा उपसा जलसिंचन हा महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून नांदेड येथील विष्णुपुरी
प्रकल्पाचे नाव घेता येते , सद्यस्थितीमध्ये या प्रकल्पांतर्गत पुराच्या पाण्यापासून जनतेचे रक्षण आणि पाळीव प्राण्यांचा बचाव हा त्यांचा मोठा  हेतू साध्य झालेला आहे. पुराच्या समस्या कधीच भेडसावणार नाहीत याची काळजी साहेबांनी घेतली होती.
       पाटबंधारे प्रकल्प राबवायचे ते शेतीला पाणी मिळावे, पिण्याची पाण्याची टंचाई दूर व्हावी म्हणूनच.औद्योगिक वसाहतीचा भरभराट करण्यासाठी नव्हे,तर अधिकाधिक धरणे दुष्काळी भागात बांधायची तर त्याचा पुरेपूर मोबदला त्या तहानलेल्या गावांना,मिळालाच पाहिजे हे साहेबांचे साधे सोपे गणित असायचे. प्रतिष्ठेचा किंवा राजकारणाचा प्रश्न म्हणून पाटबंधारे प्रकल्प राबवायचे किंवा मंजूर करायचे त्यांच्या स्वभावात बसणारे नव्हते.म्हणूनच उजनी सारख्या प्रकल्पात त्यांनी आठमाही पाणी वाटपाचा प्रश्न धसास लावला .आपला आग्रह कायम ठेवला .साहेबांच्या ग्रहाला अनेक थरातून विरोध झाला. आणि या प्रश्नाचे अनेकांनी राजकीय भांडवल केलं.पण साहेब आठमाही पाणी भूमिकेशी चिटकून राहिले.कारण त्यांना माहीत होतं की आपल्या भूमिकेला विरोध होत असला, तरी एका विशिष्ट हेतूने राबविलेल्या पाटबंधारे प्रकल्पातूनच उद्याच्या प्रगतशील महाराष्ट्राची उभारणी होणार आहे ...
            राजकारणात कोणतेही काम सरळ, सुलभ मार्गाने होत नाही.प्रतिकूल- अनुकूल वातावरणातून मार्ग काढीत त्या व्यक्तीला ध्येय गाठण्यासाठी सामोरे जावे लागते.साहेबांच्या बाबतीत विरोध पाचवीलाच पुजलेला होता.कदाचित त्यांची कार्यपद्धती,स्वभाव,शिस्त अनेकांना रुचत नसावी. सरळ मार्गाने लंडी-लबाडी न करता आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे मग भले कुणीही विरोध करो, आपले उद्दिष्ट पार करायचे हा साहेबांचा पिंडच बनलेला होता.असे विकास कामे करताना साहेबांना अनेक विरोधाला सामोरे जावे लागले साहेबांचे आचार विचार शुद्ध होते.वाटचालीचा मार्ग सरळ होता.आणि पावलो पावली जनतेचा आशीर्वाद सोबत होता म्हणूनच विरोध सहन करून महाराष्ट्राच्या विकासाला वेगळी दिशा देणारा आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारा जायकवाडी प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी त्यांना यश मिळाले.महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर राज्याचे पहिले पाठबंधारे मंत्री पदाची सूत्रे त्यांनी हाती घेतली .सन1960 ते 72 असा प्रदीर्घ काळ त्यांनी हे पद यशस्वीपणे सांभाळले व महाराष्ट्राच्या माळरानावर नंदनवन फुलवण्यासाठी साहेबांनी आपली कारकीर्द पणास लावली... उजनी,जायकवाडी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पाची उभारणी त्यांच्या देखरेखीखाली झाली. महाराष्ट्राच्या सर्व भागांत आज
 जे साखर कारखाने उभे राहिले आहेत.त्यांची मूळे ठीकठिकाणच्या
धरणप्रकल्पातच आहेत. धरणातील पाणी काठच्या शेतकऱ्यांना वापरता येते आणि त्यातून समृद्धीची बेटे निर्माण होतात.त्यामुळे आठमाही पाणी वाटप आणि धान्य पिकासाठी पाण्याचा अधिक वापर या मूलभूत कल्पना शंकरराव चव्हाण साहेब यांच्या विचारातून निर्माण झाल्या आहेत.विशेष महत्वाचे म्हणजे  सन1972 मध्ये शंकरराव चव्हाण साहेब यांच्या कडे राज्याचे कृषी खाते आले, त्या वर्षीच्या दुष्काळात राज्यातील धान्य उत्पादन सर्वात खालच्या पातळीला गेले होते ,नंतरच्या काळात कसोशीने प्रयत्न करून त्यांनी उत्पादनात वाढ केली .आणि राज्याचे धान्य उत्पादन एक कोटी टनांच्या पुढे नेण्याचा पहिला विक्रम त्यांच्याच कृषी मंत्रिपदाच्या काळात झाला.
या प्रदीर्घ अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांची विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून निवड झाली .इसवी सन 1975 ते 77 या काळात ते दोन वर्षांन पेक्षा अधिक काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले .पुढे 78 ते 80 मध्ये त्यांनी राज्याचे अर्थ खाते सांभाळले. अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन त्यांनी नांदेड मधून लोकसभेची निवडणूक लढविली आणि प्रचंड मतानी विजयी झाले.याच वर्षी नियोजन मंत्री आणि नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली. केंद्र सरकार नियोजन ,शिक्षण ,संरक्षण,गृह अर्थ ,अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत  राजीव गांधी साहेब प्रधानमंत्री असतांना त्यांच्या मंत्रिमंडळात मा. चव्हाण साहेब गृहमंत्री होते, या काळात पंजाब आणि आसाम बाबत करार करून तेथे शांतता प्रस्थापित करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता .
       मार्च सन 1986 मध्ये त्यांनी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले या पदावर पुन्हा दोन वर्षांन पेक्षा जास्त काळ काम करून ते सन 1988 मध्ये अर्थमंत्री झाले. सन 1991 पासून ते केंद्रीय गृहमंत्री आणि  राज्यातील काँग्रेस पक्ष नेते म्हणून काम सांभाळीत होते. विधानपरिषद ,विधानसभा,लोकसभा,आणि राज्यसभा ,अशा सर्व प्रकारच्या सभागृहाचे सदस्य आणि तेथून मंत्रीमंडळा मध्ये जाणारे डॉ शंकरराव चव्हाण साहेब एकमेव महाराष्ट्रीय लोकप्रतिनिधी  होते.
 त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र मा.ना.अशोकराव शंकरराव चव्हाण साहेब यांनी दोनदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या  जबाबदारीची धुरा समर्थपणे सांभाळली नांदेडजिल्हा ,मराठवाड्यासह महाराष्ट्रात अनेक विकासाची कामे करत आपले वडील स्व.शंकरराव चव्हाण साहेबयांची कामे पुढे नेत जनसामान्यांच्या विकासाचा वारसा चालविला .
                   
            अनेक उत्कृष्ट गुणवत्ता लाभलेली ही प्रगत  व्यक्ति.डॉ .स्व.शंकरराव भाऊराव चव्हाण साहेब यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या जलसंचय दूरदृष्टी कार्यास कर्तृत्वास ,विचारास बुद्धिचातुर्यास त्रिवार अभिवादन...(संदर्भ: कुसुमांजली: स्व.कुसुमताई शंकरराव चव्हाण)
   
   -लेखक/संकलन
प्रसेनजीत केरबा वाघमारे (B.Tech.food Tech)(MBA .Marketing) ,(LL.B.General law)(MA.pol .sci)
रा.सिडको नविन नांदेड 7057521897
महासचिव दक्षिण विधानसभा युवक काँग्रेस नांदेड. तथा विद्यार्थी डॉ.नारायण चव्हाण विधी महाविद्यालय नांदेड..

No comments:

Post a Comment

Pages