पुणे विभागातील 37 हजार 351 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 60 हजार 675 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 19 July 2020

पुणे विभागातील 37 हजार 351 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 60 हजार 675 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


                                     

    पुणे दि. 19:- पुणे विभागातील  37 हजार 351  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 60 हजार 675 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 21  हजार 513 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1  हजार 811 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 882  रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.56 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.98  टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील  50 हजार 46 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 31  हजार 897 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 862  आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 11 हजार 651 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 418 व पुणे कॅन्टोंन्मेंट 236 , खडकी विभागातील 47 , ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 430, जिल्हा शल्य चिकीत्सक  यांच्याकडील  80  रुग्णांचा समावेश आहे.
                पुणे जिल्हयात  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 287 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 955, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 189  व पुणे कॅन्टोंन्मेंट 29, खडकी विभागातील 23, ग्रामीण क्षेत्रातील 61, जिल्हा शल्य चिकीत्सक  यांच्याकडील  29 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 688 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.74 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.57  टक्के इतके आहे.
 कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 577 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1  हजार 854 , सातारा जिल्ह्यात 64, सोलापूर जिल्ह्यात 324, सांगली जिल्ह्यात  54 तर कोल्हापूर जिल्ह्यात 281 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 2  हजार 278  रुग्ण असून 1  हजार 285  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या  914 आहे. कोरोनाबाधित एकूण 79  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सोलापूर जिल्हयातील  5 हजार 265 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 755  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  2  हजार 140  आहे. कोरोना बाधित एकूण 370 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 945 रुग्ण असून 430 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.                      ॲक्टीव रुग्ण संख्या 486 आहे. कोरोना बाधित एकूण  29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील 2  हजार 141   कोरोना बाधीत रुग्ण असून 984  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 111 आहे. कोरोना बाधित एकूण 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 आजपर्यत विभागामध्ये एकुण  2 लाख  96 हजार  196  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी   2 लाख 91  हजार 176  नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  5 हजार 20 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2  लाख 29  हजार 781 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 60  हजार 675 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
           
( टिप :- दि. 19 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
                                 0000

No comments:

Post a Comment

Pages