किनवट येथे सागवान लाकडांसह ऑटो पकडला,दोन आरोपी ताब्यात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 7 July 2020

किनवट येथे सागवान लाकडांसह ऑटो पकडला,दोन आरोपी ताब्यात

   
                                
किनवट,दि.७ : वन विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे प्रधानसांगवी(ता.किनवट) या गावाजवळ सोमवारी ( दि.६ ) अवैध कटसाईज सागवानने भरलेला विना नंबरचा एक ऑटो  दोघा आरोपींसह पकडला.
    वनपरिक्षेत्र किनवट अंतर्गत  अवैध सागवानाने भरलेला एक ऑटो किनवट शहराकडे येत असल्याची गुप्त खबर सोमवारी दुपारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यावरून वन विभागाच्या पथकाने तात्काळ प्रधानसांगवीच्या दिशेने धाव घेतली. गावाजवळ मोठ्या शिताफीने सापळा रचून अवैध   कटसाईज  भरलेला विना नंबरचा काळा ऑटो दोन आरोपीसह पकडण्यात यश मिळविले आहे.या कारवाईत वनविभागाने  ३ हजार ४o रुपये किमतीच्या लाकडासह एक ऑटो जप्त केला.शिवाय, शेख अजीज शे. आदाम व शेख अजीम शे. हमजा  दोघे (रा. चिखली (बु. )यांना ताब्यात घेतले. 
  सदर कार्यवाही उपवनसंरक्षक आशिष ठाकरे   सहाय्यक वनसंरक्षक व्ही .जी .गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. खिलवडे,  वनपरिक्षेञ अधिकारी के. एन . खंदारे  वनपरिमंडळ अधिकारी संतवाले, शहाजी डोईफोडे, शेख फरीद, गिरी वन सर्वेअर नांदेड,  वनरक्षक संभाजी घोरबांड, अरुण चुकलवर,वैद्य, सरगे,  रवी दांडेगावकर,अनिल फोल्ले,अकबर सय्यद वनरक्षक इस्लापूर,   वाहन चालक बी. व्ही आवले, बी. टी.भुतनर, जाधव (नांदेड ),  दांडेगावकर  वनमजूर  भावसिंग जाधव,गरड, फारुख, नूर मोहमद,किरण, यांनी पार पाडली.

No comments:

Post a Comment

Pages