किनवट ,दि.३१ : कोवीड - १९ च्या पार्श्वभुमिवर रूग्णांना वेळेवर वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून २०२० - २१ अंतर्गत मांडवी ग्रामीण रूग्णालयाला रूग्णवाहीका खरेदीसाठी मंजूरी मिळाली असून ती लवकरच उपलब्ध होणार असल्याचे आ. केराम यांनी सांगीतले आहे..
२९ जुलै रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेल्या पत्रात आमदार
भीमराव केराम यांनी कोवीड - १९ च्या पार्श्वभुमिवर स्थानिक विकास निधीतून अतिदुर्गम भागात असलेल्या मांडवी ग्रामीण रूग्णालयासाठी नवीन रूग्णवाहीका खरेदीस मंजूरी देवून ती उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. विशेषत: अतिदुर्गम असलेल्या मांडवी भागातील बहुसंख्य गरीब असलेल्या बंजारा, आदिवासी व इतर घटकांच्या वैद्यकीय सेवेसाठी येथील ग्रामीण रूग्णालयास रूग्णवाहीका मिळाल्यास नागरीकांच्या वैद्यकीय सेवेसाठी लाभदायक ठरणार असल्याच्या पार्श्वभुमिवर आ.केराम यांनी सदरची मागणी केली होती. दरम्यान आपण केलेल्या प्रयत्नांना पुर्णत: यश आले असून मागणी केलेली रूग्णवाहीका लवकरच उपलब्ध होणार असल्याचे आ. केराम यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment