हिंगोली येथे रेल्वेच्या मोकळ्या जागेत होणार लाखो मे. टन चा साठा...! खासदार हेमंत पाटील यांची मागणी मंजूर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 30 July 2020

हिंगोली येथे रेल्वेच्या मोकळ्या जागेत होणार लाखो मे. टन चा साठा...! खासदार हेमंत पाटील यांची मागणी मंजूर



किनवट/माहूर : केंद्रीय अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या काळात खासदार हेमंत पाटील यांनी  मागणी केली होती कि, हिंगोली येथे  मोठ्या प्रमाणात ओस पडून असलेल्या  जागेत शेतकरी बांधवाने पिकलवलेले अन्नधान्य साठवण्यासाठी  सेंट्रल रेलसाईड वेअरहाऊस कं,लिमिटेड ,यांच्याकडून मोठ्या क्षमतेची गोदामे बांधण्यात यावीत अशी मागणी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांना  निवेदन देऊन केली होती त्याच धर्तीवर मंत्री महोदयांनी बैठक घेऊन हिंगोली येथे ०. ५० एल .एम . टी.  साठवणुकीचे गोदाम होण्यासाठी मान्यता दिली . या बैठकीला खासदार हेमंत पाटील यांच्या  समवेत केंद्रीय वेअर हाऊस कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनंत स्वरूप ,डॉ.रविकांत गुप्ता( सचिव ,रेल्वे मंत्री ) सहसंचालक वेदप्रकाश डुडेजा,(रेल्वे जमीन विकास  समिती सहसंचालक) अजय शर्मा ( कार्यकारी संचालक रेल्वे विभाग ),ए. के. सिन्हा ,(कार्यकारी संचालक, भूमि व सुविधा मंत्रालय),रविंद्र अग्रवाल ,( कार्यकारी संचालक एफसीआय),रजत शर्मा ( व्यवस्थापक एफसीआय )  यांची उपस्थिती होती . 
                  केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे झालेल्या बैठकीमध्ये मंत्री महोदयांनी याची माहिती दिली . या  बैठकीला खासदार हेमंत पाटील हे सुद्धा उपस्थित होते . खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली मतदार संघाची धुरा सांभाळली तेव्हापासून हिंगोली  जिल्हा आणि मतदार संघाने कात टाकली आहे . खासदार हेमंत पाटील यांनी मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्रीय स्तरावरून अनेक नवनवीन उपक्रम, योजना मतदार संघात रावबित आहेत अनेक नवीन प्रकल्प सुरु करत आहेत नुकताच त्यांनी केंद्रीय वाणिज्य समिती समितीपुढे हिंगोली येथे हळद बोर्ड स्थापन करण्यासाठी मागणी केली या मागणीला राज्य सरकारने मान्यता दिली  आहे . त्यांनतर हिंगोली येथे रेल्वे स्थानकाची  जागा मागील बऱ्याच दिवसापासून मोकळ्या अवस्थेत आहे .या  मोकळया जागेत शेतमाल अन्नधान्य साठवणूक करण्यासाठी मोठे गोदाम असावे या हेतूने  खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेऊन  मागणी केली होती त्या मागणीला  केंद्राच्या भारतीय अन्न महामंडळ आणि वखार महामंडळाने मान्यता दिली आहे .अन्न पुरवठा मंत्री  रामविलास पासवान  यांनी या बैठकीसाठी खासदार हेमंत पाटील यांना  आमंत्रित केले होते .केंद्रीय रेल्वे विभागाने देशात अनेक ठिकाणी रेल्वेच्या मोकळ्या जागेत जास्त साठवणूक क्षमतेचे गोदाम बांधण्यास मान्यता दिली  आहे याकामी   रेल्वेची   सेंट्रल रेलसाईड वेअरहाऊस कं,लिमिटेड कार्यरत आहे .हिंगोली येथे मोठ्या साठवणूक  क्षमतेचे गोदाम होणार असून  केंद्रीय वखार महामंडळाने जागेची चाचपणी केली असून या कामाला लवकरच सुरवात होणार आहे असेही मंत्री महोदयांनी सांगितले  एवढ्या मोठ्या साठवणूक क्षमतेच्या गोदामामुळे हिंगोली जिल्ह्यासह लागून असलेल्या नांदेड ,परभणी, वाशीम , यवतमाळ जिल्ह्याना नक्कीच फायदा होणार आहे . रेल्वे मार्गाने येणारे खत,बियाणे, सिमेंट, किंवा पाठविला जाणारा कच्चा माल साठवणूक करण्यासाठी नांदेड विभागीय रेल्वेच्या अंतर्गत एकही गोदाम नसल्याने गैरसोय होत होती. त्यामुळेच खासदार हेमंत पाटील यांनी या मागणीचा केंद्रीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून मंत्री महोदययांना  हिंगोली लोकसभा क्षेत्राच्या मागासलेपणाची जाणीव करून दिल्यामुळे केंद्राने या प्रकल्पास मान्यता दिली आहे.

No comments:

Post a Comment

Pages