अयोध्येत बुद्धविहार उभारणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 30 July 2020

अयोध्येत बुद्धविहार उभारणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले




 मुंबई दि. 30 - भारत बौद्धमय असताना अयोध्येचे नाव साकेत नगरी
होते. अयोध्येत बाबरी मस्जिद उभारण्या आधी राम मंदिर होते आणि त्यापूर्वी बुद्ध विहार होते. मात्र अयोध्येतील मंदिर मस्जिदचा वाद कायमचा मिटला आहे.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय  संविधानानुसार न्यायालयाने निकाल दिला असून त्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिर होणार आहे तसेच मस्जिद ला ही जागा देण्यात आली असून वादग्रस्त जागा सोडून अयोध्येत अन्यत्र जमीन घेऊन तेथे भव्य बुद्ध विहार उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांची भेट घेऊन सरकार कडून बुद्ध विहारासाठी जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे तसेच ट्रस्ट उभारून जागा मिळवून तेथे बुद्ध विहार उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे.  अयोध्येत बुद्ध विहार उभारावे अशी आपली मागणी मागील 10 वर्षांपासून करीत असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

अयोध्येत राम मंदिर; मस्जिद आणि बुद्ध विहार उभारून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधनातील सर्व धर्म समभावाचा संदेश जगाला द्यावा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

 2 हजार 500 वर्षांपूर्वी भारत संपुर्ण बौद्ध राष्ट्र होते. अयोध्येत वादग्रस्त जागी राम मंदिराचे तसेच बुद्ध विहाराचे ही अवशेष सापडत आहेत हे  सत्य आहे. बाबरी मस्जिद उभारण्या आधी तेथे राम मंदिर होते हे सत्य आहे तसेच राम मंदिर उभारण्या आधी तेथे बुद्ध विहार होते हेही सत्य आहे.  मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले असून वाद मिटला आहे. मात्र अयोध्येत बुद्ध विहार ही उभारले पाहिजे अशी आमची मागणी असून त्यासाठी देश भरतील बौद्ध जनतेचे सहकार्य  घेऊन ट्रस्ट उभारून  अयोध्येत  भव्य बुद्ध विहार उभारण्याचा माझा प्रयत्न असल्याचे ना रामदास आठवले यांनी आज पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                 
   

No comments:

Post a Comment

Pages