वंचित बहुजन आघाडीच्या कुर्ला विधानसभा वतीने “आरोग्य तपासणी शिबिर” भर पावसात संपन्न.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 14 July 2020

वंचित बहुजन आघाडीच्या कुर्ला विधानसभा वतीने “आरोग्य तपासणी शिबिर” भर पावसात संपन्न..


मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस कोरोना प्रमाणात वाढ होत आहे. मागास वस्त्यांमध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला असून पावसाळा सुरू झाल्याने आणखी चिंता वाढली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तसेच आरोग्य यंत्रणेवरचा देखील ताण वाढला आहे. याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दिनांक १४ जुलै रोजी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीर धम्मदीप बुद्ध, साबळे नगर  विहार, रेल्वे कॉलनी जवळ कुर्ला (पुर्व) या ठिकाणी नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

सदर शिबिराचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्षा मा. रेखा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.  शिबिरात जवळपास २५० लोकांनी उपस्थिती लावली. शिबीरामध्ये विषेश उपस्थिती महिला, व ज्येष्ठ नागरीकांची उल्लेखनिय होती तसेच सदर शिबिर शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन घेण्यात आले. तज्ञ डॉक्टरांमार्फत उपस्थित शिबिरार्थीची मोफत आरोग्य तपासाणी करण्यात आली.

शिबिरात खास करुन ताप, सर्दी, खोकला, ताप, डेंगू आणि मलेरिया आदींची तपासणी करण्यात आली तसेच तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.  कोरोना पार्श्वभूमीवर नागरीकांना निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे म्हणून अशा प्रकारचे आरोग्य शिबिर वंचित बहुजन आघाडी मार्फत महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येत आहेत. स्थानिक नागरीकांचे आरोग्य राहणीमान उंचविण्याच्या उद्देशाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबिरासाठी धम्मदीप बुद्धविहार व स्वप्नील जवळगेकर, अनिल म्हस्के, रोहित जगताप,मयुर भोसले, शैलेश सोनावने ,प्रमोद भडांरे किरण हिरवे, सचिन तायडे,या तरुणांचे अनमोल सहकार्य लाभले तर यावेळी महिला आघाडीच्या संध्या पगारे,मालती वाघ मा. सुरेश शेट्टी आणि सीमाताई तांबे आनंद जाधव, महेंद्र रोकडे,स्वेल वाघमारे ,आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages